ETV Bharat / state

प्रसिद्ध कलाकारांच्या पेटिंग्जच्या नावाखाली इन्व्हेस्टमेंट बँकरला घातला 17 कोटींचा गंडा - Famous Painters In Mumbai

Fraud With Investment Banker : एका 52 वर्षीय व्यक्तीला दोघांनी प्रख्यात चित्रकारांचे पेंटिंग्स देण्याच्या नावाखाली 17 कोटी 90 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात (Tardeo Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud News
इन्व्हेस्टमेंट बँकरला 18 कोटींचा घातला गंडा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 4:35 PM IST

मुंबई Fraud With Investment Banker : पुनित भाटिया या 52 वर्षीय इन्व्हेस्टमेंट बँकरला दोघांनी 17 कोटी 90 लाख रुपयांना प्रख्यात चित्रकारांचे पेंटिंग्स देण्याच्या नावाखाली गंडा घातला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात (Tardeo Police Station) भारतीय दंड संविधान कलम 120 ब, 34, 406, 420, 467, 668 आणि 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक शेंडे यांनी सांगितलं की, 18 डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू असून अद्याप हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करायचा की नाही, हे वरिष्ठ ठरवतील असं त्यांनी सांगितलं.

17 कोटी 90 लाखाची फसवणूक : प्रख्यात कलाकारांच्या पेंटिंग्स मध्य प्रदेशचा राजा आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांकडून खरेदी केल्याचा बनाव करत मुंबईच्या इन्वेस्टमेंट बँकरना 17 कोटी 90 लाखाला गंडा घातला आहे. तक्रारदार पुनित भाटिया यांच्या दिल्लीतील घरावरील भिंतीवर लावलेल्या पेंटिंगबाबत मित्रांना संशय आल्याने, त्या पेंटिंग्स बाबत पडताळणी केली. शेवटी चौकशीत ही पेंटिंग्स बनावट असल्याचे समोर आलं.

खोटे पेंटिंग्स देऊन केली फसवणूक : तक्रारदार पुनित भाटिया (वय 52) हे इन्व्हेस्टमेंट बँकर यांना एक जानेवारी 2022 ते 31 मे 2022 पर्यंत आरोपी राजेश राजपाल आणि विश्वांग देसाई या दोघांनी भूलथापा देऊन खोटे पेंटिंग्स देऊन 17 करोड 90 लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी तक्रारदार भाटिया यांना 17 नोव्हेंबरला कोट्यवधी रुपयांना घेतलेले पेंटिंग्स त्या किंमतीच्या कुवतीचे नसल्याचं समजल्यावर त्यांनी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

असा केला बनाव : गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात विश्वांग देसाई आणि पार्टनर मेसेज देसाई आणि दिवानजी यांची मित्राच्या पार्टीमध्ये भेट झाली. देसाई यांना पेंटिंग्स मध्ये गेला पंचवीस वर्षाचा अनुभव असून आर्ट गॅलरी डीलर सोबत भेटीसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर राजेश राजपाल हा डीलर असल्याचं सांगून ओळख करून दिली. नंतर व्हाट्सअपद्वारे आर्टिस्ट मनजीत बावा यांच्या कृष्णा विथ काऊज ही त्यांची पेंटिंग आहे. पेंटिंगचे मालक सेवानिवृत्त येस अधिकारी सुभ्रता बॅनर्जी असून पेंटिंग त्यांना विकायचं असल्याचं सांगितलं. तसंच आर्टिस्ट सुजा यांचं देखील पेंटिंग असून त्याची किंमत पावणेदोन कोटी असल्याचं सांगितलं. ही पेंटिंग्स मध्य प्रदेशच्या राजाकडून खरेदी करणार असल्याचा बनाव आरोपींनी रचला होता.

अशी झाली फसवणूक : आर्टिस्ट बावा यांची पेंटिंग्ज कुरिअरद्वारे दिल्ली येथील घराच्या पत्त्यावर तक्रारदार भाटिया यांना मिळाली होती. ती पेंटिंग्स भिंतीवर लावली होती. दरम्यान घरी आलेल्या मित्राने पेंटिंग्जबाबत संशय व्यक्त केला. त्या पेंटिंग बनावट असल्याच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्यानंतर तक्रारदार भाटिया यांनी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सुब्रता बॅनर्जी यांच्याकडे चौकशी केली. अशी कुठलीही पेंटिंग्स नसल्याचं त्यांनी सांगितलं. पेटिंग्जवर असलेल्या सह्यांची उलट तपासणीसाठी सांताक्रुज पूर्व येथे असलेल्या स्ट्रक्चर सिस्टम कंपनीकडे पाठवल्या. पेंटिंग्स वरील केलेल्या सह्या मूळ आर्टिस्टच्या नसल्याचं उघडकीस आलं. आपली फसवणूक झाल्याचं समजतात भाटिया यांनी ताडदेव पोलीस ठाण्यात काल तक्रार दाखल केली.

हेही वाचा -

  1. पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून भोंदू बाबानं पळविले १८ लाख रुपये, पाहा कसा घातला तरुणाला गंडा
  2. Fraud In Thane : ३०० कोटींची फसवणूक; ४ हजार गुंतवणूकदार सहा वर्षांपासून हवालदिल
  3. मुंबईत ग्राहकांची आर्थिक फसवणूक; आरोपीला गुजरातमधून केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.