ETV Bharat / state

Mothers murder : धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मुलानेच केली आईची हत्या...

मुंबईत आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जुहू नगर परिसरात संपत्तीच्या वादातून मुलाने आईची हत्या केली ( Mother killed over property dispute ) आणि माथेरानच्या हिल स्टेशनजवळ मृतदेहाची विल्हेवाट लावली ( Disposal of dead body near hill station ) आहे. याप्रकरणी पोलीसांनी 43 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

Mothers murder
आईच्या हत्येप्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीला अटक
author img

By

Published : Dec 9, 2022, 11:23 AM IST

Updated : Dec 9, 2022, 4:07 PM IST

मुंबई : जुहू उपनगरात मालमत्तेच्या वादातून आपल्या 74 वर्षीय आईची हत्या ( Mother killed over property dispute ) केल्याप्रकरणी आणि माथेरानच्या हिल स्टेशनजवळ मृतदेहाची विल्हेवाट ( Disposal of dead body near hill station ) लावल्याप्रकरणी एका 43 वर्षीय व्यक्तीला येथे अटक करण्यात आली आहे, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.

संपत्तीच्या वादातून मुलानेच केली आईची हत्या

मालमत्तेवरून वाद: जुहू पोलिसांनी मृतक बीना कपूरचा मृतदेह नेरळ माथेरान रोडवरील एका घाटातून बाहेर काढला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सचिन कपूर या तिच्या मुलाने घरकामगाराच्या मदतीने बेसबॉलच्या बॅटने तिला मारून तिची हत्या केली, असे त्याने सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. कपूर, एक बेरोजगार शिक्षक आणि त्याची आई एका न्यायालयात मालमत्तेवरून खटला लढत होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

आईचा मृतदेह नदीत फेकून दिला : पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीदरम्यान मुलगा सचिनने उघड केले की, त्याने रागाच्या भरात बेसबॉलच्या बॅटने आईच्या डोक्यावर अनेक वार करून त्यांचा खून केला. त्याने पोलिसांना सांगितले की, आईसोबत मालमत्तेचा वाद होता. त्याने आईचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माथेरानजवळील नदीत फेकून दिला. पोलिसांनी सांगितले की, महिलेचा मोठा मुलगा अमेरिकेत राहतो. अधिकाऱ्याने सांगितले, महिलेचा लहान मुलगा आणि त्यांच्या घरातील नोकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

घटना अशी आली समोर: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणा यांचा एक मुलगा परदेशात राहतो. आईशी संपर्क होऊ न शकल्याने आरोपी मुलाने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला हरवल्याची तक्रार दाखल करण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकाने बेपत्ता झाल्याची नोंद केल्यानंतर पोलीस तपासासाठी मृत वीणाच्या घरी पोहोचले असता वीणासोबत तिचा मुलगा सचिन आणि नोकर लालू राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सोसायटीत लावलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता सचिन हा बॉक्स इकडून तिकडे घेऊन जाताना दिसत असल्याचे समोर आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली, तेव्हा मुलाने सांगितले की मालमत्तेवरून आईसोबत वाद झाला आणि त्यांने त्याच्या आईची हत्या केली.

Last Updated : Dec 9, 2022, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.