ETV Bharat / state

26 जुलैच्या मुंबईतील जलप्रलयाला 14 वर्ष पूर्ण - bombay rain

26 जुलै 2005 ला मुंबईत पावसाने हाहाःकार उडवला होता. मुंबईत सर्वत्र पाणी साचल्याने ९०० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेतला आज १४ वर्ष पूर्ण होत आहेत.

26 जुलैच्या मुंबईतील जलप्रलयाला 14 वर्ष पूर्ण होत आहेत.
author img

By

Published : Jul 26, 2019, 8:36 PM IST

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये २६ जुलै २००५ मध्ये जलप्रलय झाला होता. या जलप्रलयात मुंबईचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच १ हजार ९४ जणांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला १४ वर्ष पूर्ण झाले आहेत. मुंबईकर या घटनेला आजही विसरलेले नाहीत. आज थोडासा जरी पाऊस पडला तरी मुंबईची 'तुंबई' होत असल्याने वेळोवेळी मुंबईकरांना २६ जुलैच्या आठवणी समोर येत असतात.

26 जुलैच्या मुंबईतील जलप्रलयाला 14 वर्ष पूर्ण होत आहेत.

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टी झाली होती. २६ जुलैला २४ तासांत मुंबईत ९४४ मिलीमीटर इतका पाऊस पडला. त्याच वेळी समुद्राला मोठी भरती असल्याने पावसाचे पाणी मुंबईतच साचले. पावसाच्या साचलेल्या पाण्यात वाहने तरंगत होती, झोपडपट्टीमधील घरांप्रमाणेच इमारतीचे तळ मजले पाण्याखाली गेले होते. मिठी नदी जवळील कुर्ला सारख्या भागात इमारतीचे एक एक माळे पाण्याखाली होते.

या घटनेत १ हजार ९४ नागरिकांचा यात मृत्यू झाला. अनेक जनावरांचाही मृत्यू त्यावेळी झाला होता. पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेकांचे मृतदेह वाहून येताना मुंबईकरांनी पाहिले. पाणी ओसरल्यावरही मुंबईला सावरायला दोन दिवस लागले. बेस्ट, रेल्वे यासारख्या वाहतूक यंत्रणा बंद पडल्याने दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना पायी जात आपले घर गाठावे लागले होते. मुंबईकर आजही या दिवसाला विसरलेले नाहीत.

आता हवामान खात्याने तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुन्हा मुंबईमध्ये २६ जुलै सारखी घटना होईल का, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. मुंबईचे व्यवस्थापन करणाऱ्या महापालिकेने नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करणे. ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प, पम्पिंग स्टेशन बांधले. तरीही २९ ऑगस्ट २०१७, २ जुलै २०१९ अशा अनेक दिवशी २६ जुलै प्रमाणे पाणी साचले. मात्र, त्यावेळी समुद्राला मोठी भरती नसल्याने मुंबईकरांवर २६ जुलैसारखी परिस्थिती ओढवलेली नाही. पालिकेने सहा पम्पिंग स्टेशन उभारली असली तरी गेल्या १४ वर्षात मोगरा व माहुल पंपिंग स्टेशनचे काम मार्गी लावता आलेले नाही.

ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प अपूर्ण-

पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक बंद पडते. नागरिकांच्या घरात पाणी शिरते. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून मुंबईमध्ये साचणारे पावसाचे पाणी समुद्रात सोडता यावे यासाठी नाल्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय 1993 मध्ये पालिकेने घेतला. हा प्रकल्प "ब्रिमस्टोव्हेड" प्रकल्प म्हणून ओळखला जातो.

२६ जुलै २००५ ला मुंबईत पावसाने हाहाःकार उडवला होता. मुंबईत सर्वत्र पाणी साचल्याने ९०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला होता. याची दखल घेत पालिकेने हा प्रकल्प गतीने राबवण्याचा निर्णय घेतला. २००७ मध्ये "ब्रिमटोव्हेड" प्रकल्प राबवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १२०० कोटी रुपये होती. आज या प्रकल्पाची किंमत १२०० कोटीहून ३६०० कोटी पर्यंत झाली आहे. तीन पटीने या प्रकल्पाची किंमत वाढली तरी पालिकेला हा प्रकल्प पूर्ण करता आलेला नाही.

Intro:मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये २६ जुलै २००५ मध्ये जलप्रलय झाला होता. या जलप्रलयात मुंबईचे करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच १०९४ जणांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला १४ वर्ष पूर्ण झाले आहेत. आजही मुंबईकर या घटनेला विसरलेले नाहीत. आज थोडासा जरी पाऊस पडला तरी मुंबईची तुंबई होत असल्याने वेळावेळी मुंबईकरांना २६ जुलैच्या आठवणी समोर येत असतात. Body:मुंबईत २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टी झाली होती. २६ जुलैला २४ तासांत मुंबईत ९४४ मिलीमीटर इतका पाऊस पडला. त्याच वेळी समुद्राला मोठी भरती असल्याने पावसाचे मुंबईतच साचले. पावसाच्या साचलेल्या पाण्यात वाहने तरंगत होती, झोपडपट्टीमधील घरांप्रमाणेच इमारतीचे तळ मजले पाण्याखाली गेले होते. मिठी नदी जवळील कुर्ला सारख्या भागात इमारतीचे एक एक माळे पाण्याखाली होते. १०९४ नागरिकांचा यात मृत्यू झाला. अनेक जनावरांचाही मृत्यूही त्यावेळी झाला होता. पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेकांचे मृतदेह वाहून येताना मुंबईकरांनी पाहिले. पाणी ओसरल्यावरही मुंबईला सावरायला दोन दिवस लागले. बेस्ट, रेल्वे यासारख्या वाहतूक यंत्रणा बंद पडल्याने दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना पायी आपले घर गाठावे लागले होते.

मुंबईकर आजही या दिवसाला विसरलेले नाहीत. आता हवामान खात्याने तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुन्हा मुंबईमध्ये २६ जुलै सारखी घटना होईल का अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. मुंबईचे व्यवस्थापन करणाऱ्या महापालिकेने नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करणे. ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प, पम्पिंग स्टेशन बांधले. तरीही २९ ऑगस्ट २०१७, २ जुलै २०१९ अशा अनेक दिवशी २६ जुलै प्रमाणे पाणी साचले. मात्र त्यावेळी समुद्राला मोठी भरती नसल्याने मुंबईकरांवर २६ जुलैसारखी परिस्थिती ओढवलेली नाही. पालिकेने सहा पम्पिंग स्टेशन उभारली असली तरी गेल्या १४ वर्षात मोगरा व माहुल पंपिंग स्टेशनचे काम मार्गी लावतात आलेले नाही.

ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प अपूर्ण -
पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक बंद पडते. नागरिकांच्या घरात पाणी शिरते. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून मुंबईमध्ये साचणारे पावसाचे पाणी समुद्रात सोडता यावे म्हणून नाल्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय 1993 मध्ये पालिकेने घेतला. हा प्रकल्प "ब्रिमस्टोव्हेड" प्रकल्प म्हणून ओळखला जातो. 26 जुलै 2005 ला मुंबईत पावसाने हाहाकार उडवला होता. मुंबईत सर्वत्र पाणी साचल्याने 900 हुन अधिक नागरिकांचा जीव गेला होता. याची दखल घेत पालिकेने हा प्रकल्प गतीने राबवण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये "ब्रिमटोव्हेड" प्रकल्प राबवण्यास सुरुवात करण्यात आली त्यावेळी या प्रकल्पाची किंमत 1200 कोटी रुपये होती. आज या प्रकल्पाची किंमत 1200 कोटीहून 3600 कोटी पर्यंत झाली आहे. तीन पटीने या प्रकल्पाची किंमत वाढली तरी पालिकेला हा प्रकल्प पूर्ण करता आलेला नाही. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.