मुंबई - वरळी येथील ससमिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्स्टाईल मध्ये ग्लिसरीन हे केमिकल लिकेज झाल्यामुळे ४ जण जखमी ( Four people injured due to glycerine leakage ) झाले. या चार जखमींना जसलोक रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना नवी मुंबई येथील ऐरोली बर्न हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमीेवर उपचार सुरू - घडलेल्या घटनेत चार जण भाजले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी जसलोक रुग्णालयात पाठवण्यात आले आणि नंतर त्यांना नवी मुंबईतील ऐरोली बर्न्स रुग्णालयात हलवण्यात आले. संस्थेच्या चाचणी विभागातील एका मशिनमधून रसायनाची गळती झाली आणि चार जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
ग्लिसरीनमुळे गळती - मुंबईतील वरळी येथील संशोधन संस्थेत रासायनिक गळतीमुळे दोन महिलांसह चार जण भाजल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार लीक झालेले रसायन हे ग्लिसरीन असल्याची माहित झाले.