ETV Bharat / state

Pawanraje Nimbalkar murder हायप्रोफाइल पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील माफीच्या साक्षीदाराच्या जबाबात तफावत - माफिचा साक्षीदार पारसमल जैनच्या जबाबात तफावत

राजकीय वर्चस्वातून काँग्रेसनेते पवनराजे निबाळकर ( Pawan Raje Nimbalkar murder Case ) यांचा कळंबोलीत खून करण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली होती. पवनराजे निंबाळकर यांचा खून त्यांचे चुलतभाऊ तथा राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील ( Former Home Minister Dr. Padmasinh Patil ) यांनी केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. याप्रकरणी पारसमल जैनला ( Pardon Witness Parasmal Jain )माफीचा साक्षिदार करण्यात आले होते. मात्र आज मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Session Court ) विशेष सीबीआय कोर्टात झालेल्या सुनावणीत पारसमल जैन याच्या जबाबात तफावत आढळून आला आहे.

Pawanraje Nimbalkar murder
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 16, 2022, 7:42 PM IST

मुंबई - बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाने ( Pawan Raje Nimbalkar murder Case ) महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या खूनप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Session Court ) विशेष सीबीआय कोर्टामध्ये माफिचा साक्षीदार पारसमल जैनची ( Pardon Witness Parasmal Jain ) उलटतपासणी घेम्यात आली. आरोपी पद्मसिंह पाटील यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी घेतलेल्या उलटतपासणीत माफीच्या साक्षीदाराच्या जबाब तफावत असल्याचे आढळून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील ( Former Home Minister Dr. Padmasinh Patil ) यांना त्यांचा चुलत भाऊ आणि स्थानिक काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर ( Congress leader Pawan Raje Nimbalkar murder Case) यांच्या जून 2006 मध्ये हत्या केल्याचा आरोप आहे.

सलग दोन दिवस उलट तपासणीस न्यायालयाची परवानगी मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Session Court ) अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात आज सुनावणी झाली आहे. माफिचा साक्षीदार पारसमल जैन ( Pardon Witness Parasmal Jain ) याच्या मॅजिस्ट्रेट समोर नोंदवण्यात आलेले 2 जबाब आणी कोर्टातील तिसऱ्या जबाबात तफावत असल्याचे म्हटले आहे. जैन यांची दोन दिवस उलट तपासणी करण्याकरिता पद्मसिंह पाटील ( Former Home Minister Dr. Padmasinh Patil ) यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी परवानगी मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 ते 4 जानेवारी सलग दोन दिवस उलट तपासणी करण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी आता 3 जानेवारी रोजी होणार आहे.

खटल्यात 128 आहेत साक्षीदार आज झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणातील 3 आरोपी कोर्टात हजर होते. या प्रकरणात सीबीआयने 9 आरोपींना अटक केले होते. यातील 3 आरोपी 2009 पासून कारागृहात आहेत. पिंटू सिंग, दिनेश तिवारी, पारसमल जैन अजूनही कारागृहात आहेत. तर, पद्मसिंह पाटील ( Former Home Minister Dr. Padmasinh Patil ) , सतीश मंदाडे, कैलास यादव, छोटू उर्फ ज्ञानेंद्र पांडे, शशिकांत कुलकर्णी हे जामीनावर आहेत. या खटल्यात 128 साक्षीदार आहेत.

काय आहे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन खासदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील ( Former Home Minister Dr. Padmasinh Patil ) या प्रकरणात प्रमुख आरोपी आहेत. त्यांचा चुलत भाऊ आणि स्थानिक काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर ( Pawan Raje Nimbalkar murder Case ) यांची 3 जून 2006 मध्ये हत्या झाली होती. पनवेलजवळील कळंबोली येथे त्यांना नेले होते. तेथेच 3 जून 2006 रोजी निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची दोन भाडोत्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. राजकीय वर्चस्वातून पवनराजे ( Pawan Raje Nimbalkar murder Case ) यांची हत्या केल्याचा आरोप आहे. 2009 ला CBI तपासात पद्मसिंह पाटील ( Former Home Minister Dr. Padmasinh Patil ) यांना आरोपी करण्यात आले होते. चुलतभाऊ पवनराजे यांची हत्या 30 लाखांची सुपारी देऊन पद्मसिंह यांनी केल्याचा ठपका CBI ने ठेवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.