ETV Bharat / state

ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना भोवलं शिवीगाळ प्रकरण; 12 डिसेंबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

ठाकरे गटाच्या वतीनं माजी महापौर दत्ता दळवी यांनी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात अपशब्द काढल्याच्या आरोपावरून भांडुप पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मुलुंड न्यायालयानं दत्ता दळवी यांना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

Former Thackeray mayor Datta Dalvi
ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांना न्यायालयीन कोठडी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 1:51 PM IST

मुंबई : भांडुप येथे दोन दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेनेनं सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये शिवसेनेचे मुंबई महापालिकेचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी सार्वजनिक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात शिवीगाळ केली, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात आला. भांडुप पोलीस ठाणे या ठिकाणी 29 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात मुलुंड न्यायालयामध्ये खटलादेखील दाखल करण्यात आला.

आरोपीला पोलीस कोठडी दिली पाहिजे : मुलुंड न्यायालयामध्ये हा खटला ताबडतोब दाखल झाला असता न्यायालयासमोर माजी महापौर दत्ता दळवी यांच्या वतीनं वकिलांनी नियुक्तीवाद केला की, पोलिसांनी दिलेली कलम 41 अंतर्गतची नोटीस महापौर दत्ता दळवी यांनी स्वीकारली नाही. हे काही गंभीर नाही. त्यामुळं यामध्ये पोलीस कोठडीची गरज नाही. मात्र शिंदे गटाच्या बाजूनं वकिलांनी बाजू मांडली की, यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे अशी शिवीगाळ करणं आणि बदनामी करणं हा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळंच यासंदर्भात आरोपीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. म्हणून मुलुंड न्यायालयानं याबाबत आरोपीला पोलीस कोठडी दिली पाहिजे.

लवकरच जामीनावर बाहेर येतील : दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर मुलुंड न्यायालयानं या संदर्भात 12 डिसेंबरपर्यंत माजी महापौर दत्ता दळवी यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. मात्र या संदर्भात ठाकरे गटाकडून दत्ता दळवी यांचा जामीन मिळण्यासाठी जोरदार तयारीदेखील सुरू केलेली आहे. सार्वजनिक सभेमध्ये दत्ता दळवी यांनी विधान केल्यानंतर भांडुप पोलिसांकडं शिंदे गटाकडून तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दत्ताजी दळवी यांना त्यांच्या घरात जाऊन अटक केली. मात्र ते लवकरच जामीनावर बाहेर येतील अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी दिली.

हेही वाचा :

  1. दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, धर्मवीरच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.