मुंबई : माजी आमदार कृष्णा हेगडे (Former MLA Krishna Hegde) यांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी येऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश (Krishna Hegde with supporters joined Shinde group) केला. यावेळी त्यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्तीही करण्यात आली.
पक्षात स्वागत : मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde group) यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना सचिव संजय मोरे, पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.
अंधेरी पोटनिवडणुकीवर काय म्हणाले होते कृष्णा हेगडे: शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिवसेनेचे नेते माजी आमदार कृष्णा हेगडे Krishna Hegde यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने षडयंत्र आखले आहे. त्याचा सामना करू आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकू असा, विश्वास व्यक्त केला होता.
धनुष्य बाण चिन्ह गोठविल्यावर काय म्हणाले होते कृष्णा हेगडे: केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बंदी घातली आहे. आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या तोंडावरच निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केल्याने संभ्रमाची स्थिती आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय निराशादायक आहे. 1966 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष बनवला. निवडणूक आयोगाने तात्पुरता चिन्ह गोठवला आहे. शिवसेनेचे नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाचे भाजप आणि शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे.