मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज न्यायालयात हजेरी लावली आहे. त्यांनी आज 100 कोटी रुपयांच्या आर्थिक।गैरव्यवहारप्रकरणात सत्र न्यायालयात हजेरी लावली. त्यांच्यासोबत आज इतर सह आरोपी कुंदन शिंदे संजीव, संजीव पलांडे हे हजर होते.सर्व आरोपींची न्यायालयाने हजेरीची नोंद करून घेतली.
काय आहे प्रकरण - माजी मंत्री आणि देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. त्यामुळे तसेच त्यांना या आरोपा प्रकरणी अनेक महिने तुरुंगात राहावे लागले होते. तरी अद्याप सदर प्रकरणाची पूर्ण चौकशी झालेली नाही. या प्रकरणातील एक मुख्य आरोपी मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी सचिन वाजे हा सध्या तळोजा तुरुंगात आहे. त्याची देखील चौकशी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी मंत्री अनिल देशमुख यांना हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे त्यांना कोर्टात नियमीतपणे ही हजेरी लावणे अत्यावश्यक होते.
फिरायला परवानगी मात्र नियमित हजेरी आवश्यक - न्यायमूर्ती रोकडे मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासमोर देशमुख यांनी विनंती केली आहे. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी मुंबई आणि इतरत्र ठिकाणी कामकाजासाठी जाण्याबाबत अनुमती मिळावी म्हणून अर्ज केला होता. स्वतः अंमलबजावणी संचलनालय यांच्या विनंतीनुसार चौकशी होईपर्यंत मुंबई आणि मुंबईच्या बाहेर त्यांना इतरत्र कुठे जाऊ देता कामा नये अशा स्वरूपाची मागणी केली होती. परंतु आता अनिल देशमुख यांच्या मागणीवर न्यायालयाने विचार करत त्यांना मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देशात कुठेही जाता येईल; असा निर्देश दिला होता. मात्र यामध्ये एक महत्त्वाची अट घातली होती. त्यांना कोर्टात नियमित हजर राहावे लागणार होते.
मागील पार्श्वभूमी - न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीनावर मुक्त केल्यानंतर देशात आणि मुंबईत चौकशी सुरू असेपर्यंत कुठेही जाण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळे न्यायालयाने किमान एक महिनाभर तरी त्यांची देशात फिरण्यासाठीची मनाई उठवलेली आहे.आज न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे त्यांना हजर राहणे कर्मप्राप्त होते. त्यामुळे त्यांनी ही हजेरी लावली. कोर्टाने देशमुख यांच्यावरील देशात इतरत्र फिरण्याची मनाई दूर केल्याने देशमुख फिरू शकणार आहेत.