ETV Bharat / state

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे

00 कोटी कथित मनी लॉन्ड्रीग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे. ऋषिकेश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टात अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर ऋषिकेश देशमुख यांच्या वतीने वकील इंद्रपाल सिंग यांनी युक्तिवाद केला होता. मात्र ईडीकडून तीन तारखा घेऊनसुद्धा युक्तिवाद करण्यात आला नव्हता.

author img

By

Published : Nov 22, 2022, 12:29 PM IST

Updated : Nov 22, 2022, 2:18 PM IST

ऋषिकेश देशमुख यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे

मुंबई - 100 कोटी कथित मनी लॉन्ड्रीग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे. ऋषिकेश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टात अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर ऋषिकेश देशमुख यांच्या वतीने वकील इंद्रपाल सिंग यांनी युक्तिवाद केला होता. मात्र ईडीकडून तीन तारखा घेऊनसुद्धा युक्तिवाद करण्यात आला नव्हता. आज ऋषिकेश देशमुख यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आला.

चौकशीला कार्यालयात न जाता अटकपूर्व जामीन अर्ज दाखल : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज मागे घेतला आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जावर ईडीच्या वतीने कुठल्याही युक्तिवाद करण्यात आला नसल्याने आज अखेर अर्ज मागे घेण्यात आला आहे. ऋषिकेश देशमुख यांना केळीच्यावतीने तीन समान पाठवण्यात आले होते. मात्र चौकशीला कार्यालयात न जाता अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मग यांच्यावतीने वरिष्ठ वकील विक्रम चौधरी तसेच वकील इंद्रपाल सिंग यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात बाजू मांडली होती. देशमुख यांच्यावतीने युक्तिवाद पूर्ण होऊन सुद्धा ईडीच्या वतीने तीन वेळा वेगवेगळ्या तारखा घेऊन देखील अद्याप युक्तिवाद करण्यात आला नसल्याने आज अर्ज मागे घेण्यात आला आहे.

प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येणार : माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात अनेकवेळा जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. परंतु न्यायालयाकडून वारंवार त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हे देखील आरोपीच्या यादीत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. म्हणून ऋषिकेश यांनी त्यापूर्वीच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र आता ऋषिकेश यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे. यापूर्वी या प्रकरणात त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. मात्र आत्तापर्यंत ते कोणत्याही चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत.

देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला : फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी आढळून आली होती. त्यानंतर घडलेल्या घडामोडींमधून या प्रकरणांचे धागेदोरे मुंबई पोलिसांतले अधिकारी सचिन वाझे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि थेट तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोचले. अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना अटक करण्यात आली.

बारा तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक : 100 कोटी कधी प्रकरणात अनिल देशमुख यांना तिकडून अटक करण्यात आली होती तब्बल बारा तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 80 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांची पत्नीचा भाऊ यांना देखील सहा आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.

काय आहे प्रकरण ? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

Last Updated : Nov 22, 2022, 2:18 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.