मुंबई : प्रभाग समिती 160 चे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी वर्षभरापूर्वी प्रभागात पाणी येत नसल्याने तीव्र आंदोलन केले होते. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, न्यायालयाने लांडगे यांचा जामीन अर्ज रद्द करून त्यांना अटक केली होती. आता पुन्हा एकदा विनोबा भावे पोलिसांनी किरण लांडगे यांना घरातून अटक केली.
शिंदे गटाच्या दबावाखाली पोलीस काम करत असल्याचा आरोप : एक वर्षांपूर्वी लांडगे यांनी आपल्या प्रभागातील पाणी प्रश्नावरून पालिका कार्यालयावर पाणी मोर्चा काढला होता. त्या मोर्चावेळी काही शिवसैनिकांनी पालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती. त्यामुळे नगरसेवक किरण लांडगे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. याबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने माजी नगरसेवक किरण लांडगे यांचा जमीन रद्द केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, शिंदे गटाच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत असा आरोप या महिलांनी केला. त्यांची समजूत काढण्यासाठी अखेर पोलिसांना किरण लांडगे यांना बाहेर आणले होते.
उपनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य : लांडगे यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर रस्ता रोको केला. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, शिंदे गटाने दबाव टाकून लांडगेंना अटक केल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. किरण लांडगे हे वॉर्ड क्रमांक (160)मधून शिवसेना (ठाकरे गट) तिकिटावर निवडून आले होते. युवासेना मुंबई समन्वयक आणि उपनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, लांडगे हे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती मानले जातात.
शिंदे गटाच्या दबावामुळे केल्याचा आरोप : लांडगे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. पालिका अधिकाऱ्याने याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वर्षभरानंतर न्यायालयाच्या आदेशाने विनोबा भावे नगर पोलिसांनी आज लांडगे यांना अटक केली. मात्र, त्यांच्या अटकेची माहिती मिळताच नागरिकांनी घाटकोपर परिसरात रास्तारोको केले. त्यानंतर नागरिकांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येऊन निदर्शने केली. शिंदे गटाच्या दबावामुळे लांडगे यांच्यावर ही कारवाई झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.
हेही वाचा : आमच्या संख्याबळाऐवजी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या प्रादेशिक कार्यकारणीचा विचार करावा - एकनाथ शिंदे