मुंबई - शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपक बाबा हांडे यांनी घाटकोपर भटवाडी येथील श्री. स्वामी समर्थ सेवा सदन वृद्धाश्रमात वृद्धांना ब्लँकेट वाटप करून त्यांच्या समवेत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी वृद्धाश्रमच्या राखी भिलारे, सूर्यकांत भिलारे, स्थानिक नगरसेविका अश्विनी हांडे, शाखाप्रमुख बाबू साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी भटवाडी मधील भूषण चव्हाण या दिव्यांग मुलाला व्हील चेअर देखील देण्यात आली.
हांडे हे दरवर्षी वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, तसेच विविध आदिवासी पाड्यात जाऊन दानधर्म करून आपला वाढदिवस साजरा करतात. यावेळी भटवाडी येथे नुकतेच भिलारे दाम्पत्याने सुरू केलेल्या वृद्धाश्रमात हांडे यांनी थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने ब्लँकेट वाटप केले. वृद्धाश्रमाला लागणाऱ्या सर्व बाबींकडे लक्ष देऊ, असे आश्वासन हांडे यांनी दिले.
हेही वाचा - देशभरात आज 'ड्राय रन'; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात लसीकरणाची रंगीत तालीम