ETV Bharat / state

Manohar Joshi Admitted : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल ; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात रवाना

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत.

Manohar Joshi
Manohar Joshi
author img

By

Published : May 23, 2023, 3:09 PM IST

मुंबई : शिवसेना पक्षाचा सुवर्णकाळ पाहणारे तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे. मनोहर जोशी यांना सोमवारी सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे मंगळवारी सकाळी माहीमच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचले.

हिंदुजा रुग्णालयाता उपचार सुरू : मनोहर जोशी हे शिवसेनेचे जुने नेते म्हणून ओळखले जातात. मनोहर जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. ते काही काळ राजकारणात सक्रिय नव्हते. काळ संध्याकाळी मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित विकार आहे. सध्या चारुलता संकला यांच्या देखरेखीखाली जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयाता उपचार सुरू आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर लवकरच माहिती देणार आहेत.

मनोहर जोशी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि जुन्या शिवसैनिकांमधील आदरणीय नेत्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. याच काळात गजानन कीर्तिकर यांच्यासह शिवसेनेचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र, मनोहर जोशी, लीलाधर डाके यांच्यासारखे ज्येष्ठ नेते ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहेत.

शिवसेनेकडून लढवली निवडणुक : मनोहर जोशी सध्या 86 वर्षांचे आहेत. त्यांनी प्रथम शिवसेनेकडून विधान परिषदेची निवडणुक लढवली होती. 1966 ते 1977 या काळात त्यांनी मुंबईचे प्रतिष्ठेचे पदही भूषवले होते. त्यानंतर ते शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्यात नंदवी गावात झाला होता. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई महापालिकेत अधिकारी म्हणून काम केले आहे.

हेही वाचा -

  1. PM Modi Australia Visit : पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर, ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध आणखी दृढ करणार
  2. Cabinet Expansion : लवकर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; भाजप - शिंदे गटातील प्रत्येकी ७-७ मंत्र्यांचा समावेश?
  3. Nitesh Rane in Nashik : नितेश राणे आज करणार त्र्यंबकराजांची महाआरती, राजकारण पुन्हा तापणार ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.