ETV Bharat / state

पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांचा राजीनामा - संजय राठोड न्यूज

वनमंत्री संजय राठोड
वनमंत्री संजय राठोड
author img

By

Published : Feb 28, 2021, 4:19 PM IST

Updated : Feb 28, 2021, 7:51 PM IST

17:46 February 28

शिवसेनेने राठोड यांचा राजीनामा घेण्यास उशीर केला- प्रविण दरेकर

प्रविण दरेकर

शिवसेनेने राठोड यांचा राजीनामा घेण्यास उशीर केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. ठाकरी बाणा दाखवत बाळासाहेबांनी शशिकांत सुतार, बबन रांव घोलप असतील यांच्यावर अण्णा हजारे यांनी आरोप केले होते तेव्हा तत्वरीत त्यांचे राजीनामे घेण्यात आले होते. त्याच पध्दतीने राजीनामा घेणे अपेक्षित होते. त्यामुळे राजीनमा घेण्याकरीता वीस दिवस का घेण्यात आला असा सवालही दरेकर यांनी विचारला आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येचे कारण समोर आले पाहिजे. सरकारचा पोलिसांवर दबाव का होता.की समाज मंहतांचा दबाव मुख्यमंत्र्यावर होता याची उत्तर मुख्यमंत्र्याना द्यावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.

16:33 February 28

संजय राठोडवर फौजदारी गुन्हे दाखल करा- आशिष शेलार

आशिष शेलार

पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. पण केवळ राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे

16:20 February 28

मुख्यमंत्र्यांचा सूसंस्कृतपणाचा बुरखा फाटलाय- अतुल भातखळकर

अतुल भातखळकर

'वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला राजीनामा तू लिटिल टू लेट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणाचा बुरखा फाटला असल्याची 'टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात १८ दिवस पुरावे नष्ट करण्याचे काम झाले याला जबाबदार कोण ? असा सवालही भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. 

16:14 February 28

राठोंडाचा राजीनामा घेतला, आता शिक्षा द्या- उमा खापरे

संजय राठोड यांनी राजीनामा दिलाअसला तरी संजय राठोड यांना शिक्षा होईपर्यंत आपला लढा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी दिली आहे. 

16:01 February 28

संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबई - संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी राठोड पत्नीसह वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शिवसेनेचे बडे नेते उपस्थित आहेत.

तत्तपूर्वी पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास अहवाल येईपर्यंत संजय राठोड यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेऊ नका, अशी विनंती राज्य सरकारला केली आहे.

Last Updated : Feb 28, 2021, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.