मुंबई- सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी फॉरेन्सिक पथक पुढील आठवड्यात सुशांतचा अंतिम वैद्यकीय अहवाल सीबीआयसमोर सादर करणार, अशी माहिती एम्सचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिली. ही बाब न्यायालयात असल्याने यावर अधिक प्रतिक्रिया देता येत नसल्याचे सांगत फॉरेन्सिक पथकाचे मत निर्विवाद असेल यात काही शंका नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
७ सप्टेंबरला एम्सच्या ५ सदस्यीय फॉरेन्सिक तज्ञांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाकडे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील फाइल्स पाहण्याची जबाबदारी देण्यात आली होती. व्हिसेरा चाचणीद्वारे अभिनेत्याला विषबाधा तर झाली नाही ना, हे शोधण्याची जबाबदारी या पथकाला देण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयने एम्सची मदत मागितली होती. सुशांतच्या २० टक्के व्हिसेरा तपासणीतून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सुशांतचा ८० टक्के व्हिसेराचा तपास मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासात केला होता. व्हिसेरा अहवाल मिळाल्यानंतर एम्सच्या डॉक्टरांचे पॅनेल या संदर्भात अंतिम बैठक घेईल. बैठकीत सुशांतच्या व्हिसेरा आणि शवविच्छेदन अहवालावर चर्चा होईल. त्यानंतर एम्सचे डॉक्टर सुशांतच्या मृत्यूचा अंतिम अहवाल सीबीआयला देईल.
हेही वाचा- अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइनच, काही ठिकाणी अडचणी आल्यास पर्याय अवलंबू - उदय सामंत