मुंबई - काँग्रेस नेते संजय नुरुपम ( Sanjay Nirupam ) याची मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलिसांनी सुटका ( Sanjay Nirupam Released ) केली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी जबरदस्तीने पोलीस स्टेशनला नेल्याचे त्यांनी ट्विट ( Tweet by Sanjay Nirupam ) करुन त्यांनी हि माहिती होती.पोलिसांनी घरात घुसून जबरदस्तीने वर्सोवा पोलीस स्टेशनला नेले असे निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी केलेला पक्षप्रवेश उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारांचा अपमान करणारा असल्याने त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा. अशी मागणी करण्यासाठी बाईक रॅली काढली होती. आमचा शांततापूर्ण राजकीय कार्यक्रम पार पाडण्यास परवानगी देण्याऐवजी पोलिसांनी कोणताही आदेश न दाखवता मला जबरदस्तीने ताब्यात घेतले, असेही ट्विट निरुपम यांनी केले आहे.
गजानन कीर्तिकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बाईक रॅली काढण्यास केला अटकाव - उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी केलेला पक्षप्रवेश उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारांचा अपमान करणारा असल्याने त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा. या मागणीसाठी माजी खासदार, काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज दुपारी 2 वाजता बाईक रॅली काढण्यात येणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी संजय निरुपम अटक करून, त्यांना वर्सोवा पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
किर्तीकरांणा शिंदे गटात प्रवेश - गजानन किर्तीकर यांनी नुकताच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर किर्तीकर यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी संजय निरुपम हे आज बाईक रॅली काढणार होते. पण त्याआधीच वर्सोवा पोलिसांनी त्यांना लोखंडवाला शास्त्रीनगरमधील त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. गजानन किर्तीकर हे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील खासदार असून त्यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश मतदारांचा अपमान असून त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत माजी खासदार आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत बाईक रॅली काढण्यापासून रोखलं.