ETV Bharat / state

Cyber Financial Fraud Exposed : सायबर फ्रॉड करून कंपनीच्या खात्यातील रक्कम स्वत:च्या खात्यात वळविण्यास भाग पाडले; दोघांना मध्य प्रदेशातून अटक - बँक खात्यात बदल झाल्याबाबत खोटा मेल आला

सायबर गुन्ह्यातील दोन आरोपींना अंधेरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त भागातून अटक केली आहे. निरज राजेंद्र राठोर आणि धर्मेंद्र सुदर्शन पांडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यास खोटा मेल पाठवून त्याला लाखो रुपये बॅंकेच्या खात्यात वळते करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून पोलिसांनी दोन आरोपींना मध्य प्रदेशातून अटक केली.

Cyber Financial Fraud Exposed
आरोपींना अटक
author img

By

Published : Aug 9, 2023, 9:37 PM IST

मुंबई : 14 फेब्रुवारी 2022 ला तक्रारदार हे त्यांच्या कंपनीच्या कार्यालयामध्ये असताना कंपनीच्या ईमेलवर त्यांना माल पुरवठा करणाऱ्या गांधी कंपनीच्या ईमेलवरून कंपनीच्या बँक खात्यात बदल झाल्याबाबत खोटा मेल आला. यानंतर सायबर आरोपीने तक्रारदाराच्या कंपनीची दिशाभूल करून आरोपी निरज राठोर याच्या बँक खात्यात ऑनलाईन 8 लाख 30 हजार 521 रुपये पाठविण्यास भाग पाडले आणि तक्रारदाराच्या कंपनीची ऑनलाईन फसवणूक केली. त्यावरून अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या जबाबावरून भारतीय दंड संहिता कलम ४१९, ४२० सह कलम ६६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासामुळे माहिती उघड : या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने अंधेरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गुडरे यांनी तांत्रिक तपास सुरू केला. या गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या कंपनीची फसवणूक झालेली रक्कम ही निरज राठोर या आरोपीच्या बँक खात्यावर वळती झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून या गुन्ह्यातील एकूण ७ लाख ४३ हजार ९६ रूपये इतकी रक्कम अंधेरी पोलीस ठाण्याकडून गोठविण्यात आली आहे.

अखेर आरोपींना अटक : या गुन्ह्याप्रकरणी तांत्रिक माहितीच्या विश्लेषनावरून पोलीस उपनिरीक्षक तोडकर यांचे पथक मध्य प्रदेशातील बालाघाट येथे गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी निरज राजेंद्र राठोर (ता. बामणी, जिल्हा मांडला) येथे राहावयास गेला असल्याचा शोध लावला. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने बँक खाते हे आरोपी धर्मेंद्र सुदर्शन पांडे (रा. कटरा, मंडला जिल्हा) याला वापरायला दिले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पथकाने कटरा, मंडला येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला.

दोघांनाही पोलीस कोठडी : पांडेला ताब्यात घेऊन या गुन्ह्यातील सहभागावरून राठोर आणि पांडे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही ट्रांझिट रिमांड सुनावला. यानंतर पोलिसांनी पुन्हा दोघांनाही 8 ऑगस्टला अंधेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा:

  1. Bhandara Crime: क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
  2. Satara Crime : एटीएममध्ये छेडछाड करून ३ कोटींची फसवणूक; उत्तर प्रदेशातील चौघांना अटक
  3. सावधान.. लसीकरणावर भामट्यांची नजर, नागरिकांची होऊ शकते ऑनलाईन फसवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.