ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १ हजारावर कोरोनाबाधित रुग्णांची नोंद - Record of corona affected patients

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 1 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात १०८६ रुग्णांची तर १ मृत्यूंची नोंद झली आहे. ८०६ रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५३ हजार ३७७ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७१ मृत्यूची नोंद झाली आहे.

Corona
Corona
author img

By

Published : Apr 13, 2023, 9:51 PM IST

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागले असून आज सलग दुसऱ्या दिवशी एक हजारावर कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल १११५ रुग्णांची नोंद झाली होती. आज पुन्हा १०८६ रुग्णांची नोंद झाली आहे. काल तब्बल ९ रुग्णांचा मृत्यू झाला होता आज केवळ १ मृत्यू नोंद झाला आहे. मृत्यू संख्या कमी नोंद झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

रुग्णसंख्येत वाढ सुरूच : राज्यात गेल्या २४ तासात १०८६ रुग्णांची तर १ मृत्यूंची नोंद झली आहे. ८०६ रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५३ हजार ३७७ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७१ मृत्यूची नोंद झाली आहे. ७९ लाख ९९ हजार २०६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात ५७०० सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १६३५, ठाणे १०४०, पुणे ७५२, नागपूर ६३३, रायगड २४५, पालघर १६४, सांगली १६९, सोलापूर १३६, सातारा १०५, उस्मानाबाद १३२ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत २७४ नवे रुग्ण : मुंबईत काल ३२० रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात घट होऊन २७४ रुग्णांची नोंद झाली आहे. काल २ मृत्यूंची नोंद झाली आज एकही मृत्यू नोंद झालेला नाही. मुंबईत सध्या १६३५ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ११ लाख ५९ हजार ८१९ रुग्णांची तर १९ हजार ७५२ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णालयात १२१ रुग्ण दाखल असून ३४ रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासली आहे.

मास्क वापरा : दरम्यान कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा. पालिका रुग्णालय आणि कार्यालयात मास्क वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - Asad Encounter : एन्काउंटर करण्यासाठीदेखील आहेत नियम, जाणून घ्या, सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.