ETV Bharat / state

Flower Seller Kidnapping Mumbai : 7 लाख रुपयांसाठी फूल विक्रेत्याचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

ऊसतोडणीचे सात लाख रुपये परत मिळविण्यासाठी फूल विक्रेत्याचे अपहरण करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. सुनीता यांचे पती रमेश काळे अपहरण करून त्यांना १ महिन्यापर्यंत कैद करून खंडणीची मागणी (Kidnapping and ransom demand) करण्यात आली होती. पोलीस तक्रारीनंतर रमेश काळे या इसमाची कर्नाटक राज्यातील गुलबर्गा आणि बेळगाव जिल्हा येथे तपास करून महाराष्ट्रातील सांगली जिल्हयातून सुखरूप सुटका (Kidnapped flower seller release) करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीस अटक (Kidnapping accused arrested) करण्यात आली आहे. (Mumbai Crime ) संतोष काळे (२८) असे आरोपीचे नाव असून अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. (Latest news from Mumbai)

Flower Seller Kidnapping Mumbai
फूल विक्रेत्याचे अपहरण
author img

By

Published : Jan 3, 2023, 10:36 PM IST

मुंबई : डिलाईल रोड येथील मॅरेथॉन फ्युचरेक्स समोरील फुटपाथवर अनेक कुटुंब फुलांचा धंदा करून त्यांनी रस्त्यावरच संसार मांडला आहे. मात्र, काळे कुटुंबावर १ डिसेंबरला संकट कोसळले. १ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मॅरेथॉन फ्युचरेक्स समोरील फुटपाथवर फिर्यादी सुनिता रमेश काळे यांचे पती रमेश बाबु काळे आणि मुले फुलविक्रीचा धंदा करीत असताना आरोपी बापु प्रल्हाद चव्हाण आणि विलास प्रल्हाद चव्हाण यांनी एका अनोळखी इसमाच्या मदतीने आपसात संगनमताने फुलांची मोठी ऑर्डर असल्याचे खोटे सांगुन सुनीता यांच्या पतीस टॅक्सीमध्ये बसवुन गाव-पांडवझरी, जत, सांगली येथे नेवून त्याचे अपहरण करून त्यास एका बंदिस्त रूममध्ये डांबुन ठेवले. (Latest news from Mumbai) त्यानंतर सुनीता यांच्याकडे ७ लाखांची खंडणी (Kidnapping and ransom demand) मागू लागले. (Kidnapped flower seller release) खंडणी न दिल्यास पतीस सोडणार नसल्याची धमकी दिली. (Kidnapping accused arrested)

खंडणीसाठी चिथावणी : त्यानंतर सुनीता यांनी बापू प्रल्हाद चव्हाण, वय ४५ वर्षे, विलास प्रल्हाद चव्हाण, ३२ वर्षे व एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ८ डिसेंबरला आयपीसी कलम ३६३, ३८४, ३४३, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यामध्ये आरोपी महिला मयुरी प्रल्हाद चव्हाण, वय ३५ वर्षे आणि संतोष अर्जुन काळे, वय २८ वर्षे यांनी इतर आरोपीस मदत करून खंडणी मागण्यासाठी चिथावणी देऊन बळीतास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच सतत मारहाण केल्याचे आणि गुप्तपणे कैदेत ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात कलम ३६५,३२३, ५०६ (२), ११४ कलमांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चांद्रमोरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

आरोपींचा शोध सुरू : हे प्रकरण हे ऊसतोडीचे पैसे घेतल्याचे वादावरून घडलेले आहे. गुन्हा नोंद होताच दोन तपास पथक हे सतत कर्नाटक आणि सांगली या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये आरोपी आणि अपहरण केलेले रमेश शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहिती सतत प्राप्त त्याआधारे यातील आरोपी संतोष अर्जुन काळे, वय २८ वर्षे यास ताब्यात घेवुन त्यानंतर त्याचे मार्फतीने व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहीतीच्या आधारे यातील बळीत रमेश बाबु काळे, वय ३५ वर्षे यासही सुखरूप ताब्यात घेतले. तसेच आरोपी संतोष अर्जुन काळे, वय २८ वर्षे यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने ५ जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. बळीत इसमाकडे चौकशी केली असता आरोपींनी जीवे ठार मारण्याची सतत भिती दाखवुन कैदेत ठेवल्याचे त्याने सांगितले. अटक आरोपीच्या मदतीने इतर चार पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे. बापु प्रल्हाद चव्हाण, वय ४५ वर्षे, विलास प्रल्हाद चव्हाण, वय ३४ वर्षे, मयुरा प्रल्हाद चव्हाण, वय ३५ वर्षे आणि एक अनोळखी यांचा पोलीस शोध घेत असून हे चौघेही सांगलीतील आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.