मुंबई : मुंबईमध्ये दरवर्षी युरोपीय देशातून 150 प्रकारचे पक्षी हिवाळ्यात मुंबई ठाण्याच्या खाडीमध्ये ( Flamingo are coming in bay area of Mumbai ) येतात. अडीच लाखांपेक्षा अधिक संख्येने हे पक्ष येतात आणि यामध्ये 99 टक्के फ्लेमिंगो पक्षी आहेत. ज्याला आपल्या मराठीमध्ये 'रोहित पक्षी' असे म्हटले जाते. पक्षी हे आपल्या सूक्ष्मजीव प्रणाली मधील एका साखळीसारखे आहेत त्यांचा अप्रत्यक्षपणे फायदा मानवी पर्यावरणाला, शेतीला होतो. या रोहित पक्षीचा आणि इतर पक्ष्यांचा ठाव ठिकाणा, त्याचं घरटे शोधण्याचा अनोखा प्रयत्न बॉम्बे नॅचरल हिस्टोरीने सोसायटी ( Bombay Natural History Society ) यांनी केलेला आहे.
अडीच लाख फ्लोमिंगो मुंबईत येतात : आपल्या शेतात घरात आणि गच्चीवर चिमण्या येतात त्याचा अप्रत्यक्ष फायदा मानवसृष्टीला प्रचंड प्रमाणात होतो. तसाच रोहित पक्षी ज्याचे इंग्रजी नाव फ्लेमिंगो त्याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांनी महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. दरवर्षी मुंबईच्या खाडीमध्ये अडीच लाख पेक्षा अधिक फ्लेमिंगो पक्षी येतात. बीएनएचएस 2017 पासून ठाणे खाडीला भेट देणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करत आहे. हिवाळ्यातील पक्ष्यांच्या निवास स्थानाचा वापर आणि स्थलांतराचे स्वरूप समजून घेतात. संशोधकांनी ठाणे खाडीच्या आसपासच्या ठिकाणी पक्ष्यांच्या अंगठ्या आणि रंगाचे ध्वज तैनात केले. आतापर्यंत, सुमारे 25000 पक्ष्यांना रिंग आणि झेंडा लावण्यात आला आहे, आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने भारतामध्ये आणि इतर देशांतून ठाव ठिकाणाचा माघ काढला आहे. युरोपाच्या विविध देशांमधून फ्लेमिंगो आलेला आढळतो.
फ्लेमिंगोच्या शोधासाठी जीपीएस सिस्टीम्स : फ्लेमिंगो स्थलांतर समजून घेण्यासाठी, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी द्वारे जानेवारी ते एप्रिल 2022 पर्यंत तीन मोठ्या आणि तीन कमी फ्लेमिंगोवर सहा GPS/GSM टॅग लावले आहेत. तीन फ्लेमिंगो आता गुजरातला परतले आहेत. या फ्लेमिंगोच्या हालचालींचा तपशील खालीलप्रमाणे आहे, 19 एप्रिल 2022 रोजी नवी मुंबई येथे GSM टॅग आणि लेग बँड 'ALD' ने सुसज्ज असलेला 'हुमायून' हा लेसर फ्लेमिंगो (फिनिकॉप्टरस मायनर) 30 जून 2022 रोजी भावनगर, गुजरात येथे परतला. तर'सलीम' ('ASR' लेग बँड), जे ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावावर आहे, हे गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील घोघा शहराजवळील ओल्या जमिनीवर पोहोचले आहे. 6 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 4.57 वाजता वाशीजवळील वेटलँडवरून नॉन-स्टॉप उड्डाण घेतले, राज्यातील डहाणूवरून उड्डाण केले आणि 7 जुलै 2022 रोजी सकाळी 9.25 वाजता घोघा बीचवर पोहोचले. हा 300 किमी प्रवास करण्यासाठी त्यांना 16.28 तास लागले. फ्लेमिंगो जेव्हा अंतिम ठिकाणी पोहोचेल तेव्हा नक्कीच त्याचे घर त्याचा अधिवास कोणत्या देशात कोणत्या प्रदेशात आहे, ते काही काळानंतर समजू शकेल.
जीपीएस सॅटेलाईट टॅग लावण्याची पद्धत : फ्लोमिंग पक्षी त्याच्या गळ्याला किंवा पाठीवर किंवा पायाला विशिष्ट प्रकारचे छोटेसे उपकरण लावले जाते. यानंतर फ्लेमिंगो पक्षी जेव्हा उडत जातो. तर रेडिओ लहरीद्वारे त्याच्या हालचाली टिपल्या जातात. तसेच सॅटेलाईट द्वारे त्याच्या हालचाली टिपल्या जातात. आणि सॅटेलाईट कडे त्याच्या हालचाली नोंदवल्यानंतर त्या सरळ बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संगणक प्रणालीमध्ये नोंदवल्या जातात. यावरूनच पक्षी पाचशे किलोमीटर किंवा सहाशे किलोमीटर कुठे गेला आहे. तो गुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी आता आहे हे शोधण्याचा प्रथमच प्रयत्न या सोसायटीने केलेला आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्टोरी : यासंदर्भात बॉम्बे नॅचरल हिस्टरीचे सोसायटीचे उपसंचालक राहुल खोत यांनी याबाबत सविस्तर सांगितले. ते म्हणतात की," पहिली पद्धत म्हणजे पायाला रिंग लावणे. कोणत्याही पक्षाच्या पायामध्ये विशिष्ट प्रकारची रिंग लावली जाते. त्या रिंगवर नंबर असतो आणि हा पक्षी ज्या ठिकाणी कुठे गेला असेल, तर तिकडची व्यक्ती तर रिंग पाहून त्याचा नंबर नोंदवते. आणि ते आम्हाला कळवते. यामुळे त्या पक्षाचा ठाव ठिकाणा आपल्याला समजतो. तसेच यावर्षी आम्ही रेडिओ टॅग आणि सॅटॅलाइट टॅग असे छोटसं उपकरण फ्लेमिंगो अर्थात 'रोहित' पक्षी याच्या पाठीवर गळ्यावर आणि पायाच्या ठिकाणी लावल आहे. ज्यामुळे प्राथमिक स्वरूपात हा प्रयोग यशस्वी ठरला आहे .आणि इथून उडालेले फ्रेमिंग आता गुजरातमध्ये 300 किलोमीटर जवळ कुठल्या ठिकाणी आहे याची माहिती सॅटेलाईट द्वारे आम्हाला प्राप्त झाली."
फ्लेमिंगोचा फायदा : शाश्वत व टिकाऊ पर्यावरण असणे हे मानव जातीच्या भल्यासाठी आहे. आणि असंख्य सूक्ष्म प्राणी कृमी, कीटक तसेच पक्षांचा देखील पर्यावरण टिकवण्यास हातभार लागतो.बोरॉन, लिथियम, पोटॅशियम आणि नायट्रेट्ससह विविध घटक पाणथळ जागेत आणि शेतात महत्त्वाचे असतात. फ्लेमिंगोच्या विष्ठेमुळे त्याच्या थुंकीमुळे हे घटक त्या मातीमध्ये रुजतात. निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये जसे बॅक्टेरिया दही मध्ये असतात आणि आपल्या पोटाचे पचन होण्यास मदत होते. तसेच फ्लेमिंगोच्या विष्ठेमुळे देखील अनेक प्रकारचे चांगले सूक्ष्मजीव त्या मातीत पसरतात त्यामुळे पर्यावरण टिकण्यास मदत होते.
500 किमी अंतर कापण्यास 22 तास : सध्या काही पक्षी झिंझुवाडा शहराजवळ आहे. मुंबईहून गुजरातमध्ये पोहोचणारा हा चौथा GPS/GSM टॅग केलेला पक्षी आहे महाराणी महाराजाधीराज मिर्झा महाराव सर खेंगरजी तिसरा सवाई बहादूर राव यांच्या नावावर असलेला 'खेंगरजी तिसरा' हा प्रौढ ग्रेटर फ्लेमिंगो याने 2 ऑगस्टच्या रात्री मुंबईचा किनारा सोडला आणि 2 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी गुजरातमधील एल आर के येथे उतरला. त्याला 500 किमी अंतर कापण्यास 22 तास लागले. मुंबईहून गुजरातमध्ये पोहोचणारा हा पाचवा जीपीएस/जीएसएम टॅग केलेला पक्षी आहे. आणि एलआरकेला पोहोचणारा दुसरा पक्षी आहे.नवी मुंबईतील सहाव्या अल्पवयीन फ्लेमिंगोने ठाणे खाडीतील स्थानिक हालचाली दाखवल्या आहेत परंतु आतापर्यंत मिळालेला डेटा निर्णायक नाही. आम्हाला वाटते की ते प्रजनन भूमीपर्यंत पोहोचले आहे आणि येत्या काही महिन्यांत ते ठाणे खाडीवर परत आल्यावर पूर्ण चित्र मिळेल.