मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर राजस्थानला जाण्यासाठी निघालेल्या कामगार आणि प्रवाशांपैकी होम क्वारंटाईनचे शिक्के असलेले 5 जण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. देशांतर्गत सर्व सीमा खासगी आणि सरकारी वाहनांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परराज्यातून आलेल्या लोकांची घराकडे जाण्यासाठी खटपट सुरू आहे.
आवश्यकता वाटल्यास त्या पाच जणांचे घशाच्या द्रावाचे नमुने तपासणी करता पाठविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाने दिली आहे. त्या 5 जणांना आता वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे.
राजस्थानला जाऊ पाहणाऱ्या 600 ते 700 नागरिकांना प्रशासनाने तलासरी येथे महाविद्यालयाचा शाळेच्या मैदान परिसरात ठेवले आहे. याठिकाणी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्यने तैनात असून, या नागरिकांना त्यांच्या नियोजित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न प्रशासन करत आहे.