ETV Bharat / state

ST Buses For Pandharpur Yatra 2023: श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी पाच हजार विशेष बसेस सोडणार- मुख्यमंत्री शिंदे

आषाढी एकादशी निमित्त वारकरी भक्तांना पांडुरंग पावला असून श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी सुमारे ५ हजार विशेष गाड्या राज्यभरातून सोडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी परिवहन महामंडळ विभागाला या संदर्भातील निर्देश दिले आहेत.

ST Buses For Pandharpur Yatra 2023
मुख्यमंत्री शिंदे
author img

By

Published : May 15, 2023, 8:31 PM IST

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर आषाढी यात्रेसाठीच्या एसटी बससेवेच्या नियोजनाबाबत आज (सोमवारी) सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत आढावा घेतला. राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

'ही' जबाबदारी लालपरीची: पंढरपूर आषाढी यात्रा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला यावेळी अनन्यसाधारण महत्त्व असते. एसटीकडून याकाळात प्रवाशांना, वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा दिल्या जाव्यात, गावापासून थेट पंढरपूरपर्यंत विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटी पहिवहन महामंडळावर असते.

विभागानुसार गाड्यांची संख्या: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा जिल्ह्यातून गाड्यांचे व्यवस्थापन केले जाते. या यात्रेसाठी सुमारे पाच हजार गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी परिवहन विभागाला दिले. तसेच औरंगाबादमधून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशा स्वरुपाची वाहतूक व्यवस्था असणार आहे. येत्या २५ जून पासून ५ जुलैपर्यंत या विशेष गाड्या धावतील. तसेच वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २७ जूनला सुमारे २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.

तात्पूरर्ती चार बस स्थानके उभारणार: राज्यभरातील लाखो भाविकांसाठी पंढरपूर यात्रेकरिता विविध विभागातून बसेस सोडण्यात येतील. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची एकाच स्थानकात होणारी गर्दी टाळण्यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना या चार ठिकाणी तात्पुरती बस स्थानके उभारली जातील. प्रवाशांना येथील बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी विविध सोयी-सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे पहिवहन विभागाने स्पष्ट केले.

हेही वाचा:

  1. Ajit Pawar On Loksabha Election: लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता- अजित पवार
  2. Pradeep Kurulkar ATS Custody : प्रदीप कुरुलकरला एक दिवसाची 'एटीएस' कोठडी; हनी ट्रॅपमध्ये अजून एक एअर फोर्सचा अधिकारी?
  3. Ajit Pawar on MLAs Disqualified : सोळा आमदार अपात्र झाले तरीही सरकारला कोणताच धोका नाही; विधानानंतर अजित पवार पुन्हा चर्चेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.