ETV Bharat / state

गुड न्युज! मंगळवारी धारावीत कोरोनाचे केवळ 5 रुग्ण, आजवरचा सर्वात कमी आकडा

धारावीत मंगळवारी केवळ 5 रुग्ण आढळले आहेत. हा आजवरचा सर्वात कमी आकडा आहे. तर, धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा 2 हजार 189 इतका झाला आहे.

धारावी
धारावी
author img

By

Published : Jun 24, 2020, 3:44 PM IST

Updated : Jun 24, 2020, 4:39 PM IST

मुंबई - येथे धारावीतील रुग्णसंख्या कमी होत असून मंगळवारी धारावीत केवळ 5 रुग्ण आढळून आले आहेत. एप्रिलपासून आजपर्यंतचा हा सर्वात कमी आकडा आहे. त्यामुळे ही बाब धारावीकरच नव्हे तर मुंबईकरांसाठीही दिलासादायक मानली जात आहे. महत्वाचे म्हणजे धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या कामाचे नुकतेच केंद्र सरकारनेही कौतुक केले आहे.

गेल्या दोन महिन्यात धारावीत कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत 'जी' उत्तर विभागाच्या अधिकारी-कर्मचारी आणि खासगी डॉक्टरांनी कोरोना नियंत्रणात आणण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे मंगळवारी धारावीत केवळ 5 रुग्ण आढळले आहेत. हा आजवरचा सर्वात कमी आकडा आहे. याआधी सर्वात कमी 7 रुग्ण आठवड्याभरापूर्वी आढळले होते. दरम्यान काल सर्वात कमी रुग्ण आढळले असून ही दिलासादायक बाब आहे. पण त्याचवेळी धारावीत एक मृत्यू झाला आहे.

धारावीतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने आता रुग्ण दुप्पटीचा दरदेखील 80 दिवसांच्या वर गेला आहे. तर, आता धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा 2 हजार 189 इतका झाला आहे. जी उत्तरमधील कोरोनाचे दुसरे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर आणि माहीम परिसरातही आता कोरोना नियंत्रणात येत आहे. आज दादरमध्ये 15 तर, माहीममध्ये 18 रुग्ण आढळले आहेत. यामुळे जी उत्तरमधील रुग्णसंख्या 3 हजार 839 वर पोहोचली आहे.

Last Updated : Jun 24, 2020, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.