मुंबई- मध्य रेल्वेने विविध व्यापाऱ्यांच्या सूचनांचा विचार करुन 14 ऑगस्ट पासून नाशिक जिल्ह्यातील देवळाली ते बिहार राज्यातील दानापूर किसान रेल्वे पार्सल विशेष रेल्वेगाडी मुजफ्फरपूर जंक्शन पर्यंत सुधारित वेळापत्रकानुसार चालविण्याचे ठरवले आहे. 7 ऑगस्टला या रेल्वेचा शुभारंभ केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून करण्यात आला होता. या ट्रेनमध्ये 10 पार्सल व्हॅन आणि एक सामान कम ब्रेक व्हॅन असेल.
सुधारित वेळेसह तपशील पुढीलप्रमाणे:
ट्रेन क्रमांक 00107 साप्ताहिक किसान रेल्वे आता देवळाली येथून शुक्रवार 14, 21, व 28 तारखेला 6 वाजता सुटेल आणि मुजफ्फरपूर जंक्शन येथे रविवारी 3 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल.
हेही वाचा-देशातील पहिली 'किसान रेल्वे' नाशिकच्या देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाहून बिहारकडे रवाना
ट्रेन क्रमांक 00108 साप्ताहिक किसान रेल्वे रविवार 16, 23 आणि 30 तारखेला मुजफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी देवळाली येथे 7 वाजून 45 वाजता पोहोचेल.
किसान रेल्वेचे थांबे-
नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हानपूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, गदरवाडा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि दानापूर