ETV Bharat / state

Mumbai Train Firing : जवान गोळीबारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल, आरोपीला उद्या न्यायालयात हजर करणार

मुंबई-जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार प्रकरणी आरोपी जवानाला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Mumbai Train Firing
मुंबई ट्रेन गोळीबार
author img

By

Published : Jul 31, 2023, 9:03 PM IST

Updated : Jul 31, 2023, 10:35 PM IST

मुंबई : सोमवारी पहाटे मुंबई-जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबाराचा थरार घडला. पालघर रेल्वे स्थानकाजवळ एका आरपीएफ जवानाने त्याच्या सहकाऱ्यावर धावत्या गाडीत गोळ्या झाडल्या. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरपीफ जवानांच्या आपापसातील वादामुळे ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

मंगळवारी न्यायालयात हजर करणार : या घटनेप्रकरणी बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी जवानाला त्याच्या शस्त्रासह अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी जवानावर ९४६/२०२३, कलम ३०२ भादंवि सह कलम ३, २५, २७ भारतीय हत्यार कायदा सह कलम १५२ भारतीय रेल्वे कायदा अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या जवानाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

तपासासाठी विशेष तपास पथक नियुक्त : या घटनेतील मृत व्यक्तींपैकी तीन जणांची ओळख पटली आहे. जवानाचा सहकारी टिकाराम मिना (वय ५८ वर्षे), अजगर अब्बास शेख, (वय ४८ वर्षे) आणि अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन मानपूरवाला, (वय ६२ वर्षे) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आरोपी जवान मानसिकदृष्ट्या अस्वस्थ : आरोपी जवान चेतन सिंह हा मुळचा उत्तर प्रदेशातील हाथरसचा रहिवासी आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून गेल्या अनेक दिवसांपासून तणावात असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. चेतन काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. वरिष्ठांनी त्याची उलटसुलट ड्युटी लावल्याने तो टेन्शनमध्ये होता, असे त्याचे कुटुंबीय म्हणाले. चेतनचे वडीलदेखील आरपीएफ जवान होते. 2007 मध्ये त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंतर 2009 मध्ये चेतनला त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली.

रात्री उशिरा आरोपीची वैद्यकीय तपासणी - रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीची तब्येत बिघडल्याने रात्री नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांच्या गाडीतून डॉक्टरांना पोलीस घेऊन आले होते. मात्र सव्वादहा वाजताच्या सुमारास आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे.

हे ही वाचा :

  1. Firing In Mumbai Jaipur Express : 'तो मानसिकदृष्ट्या आजारी होता, अधिकारी छळ करायचे';जवानाच्या कुटुंबियांचे धक्कादायक खुलासे
  2. Jaipur to Mumbai Train firing : जयपूर-मुंबई रेल्वेत नेमका गोळीबार कसा झाला? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती
  3. Jaipur Mumbai Train firing : आरोपी आरपीएफ जवानाला आज तीन वाजता न्यायालयात करण्यात येणार हजर, गोळीबाराचे काय आहे प्रकरण?

Last Updated : Jul 31, 2023, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.