विरार - मुंबई - अहमादाबाद राष्ट्रीय मार्गावर ( Mumbai Ahemdabad National Highway ) पेंढा वाहून जाणाऱ्या वाहनाला भीषण आग लागल्याची घटना समोर ( Fire Running Truck In Virar ) आली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
भाताणे येथून जनावरांचा चारा पेंढा भरून जाणारा ट्रक भालिवली मार्गे येत असताना विद्युत तारांना स्पर्श झाल्याने त्याला आग ( Animal Food Truck Fire ) लागली. महामर्गावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराने याबाबत चालकाला माहिती दिली. त्यावेळी चालकाने वाहन भामटपाडा पुलाजवळ बाजूला घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती देत, आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, ग्रामस्थांनी अग्निशमन दलाची वाट न पाहता सुरुवातीला एक दुकानातून पाईप घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पेंढा पुर्ण जळून खाक झाला आहे.
हेही वाचा - ST Worker Suspension : आज २७० एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई; एकूण आकडा साडेसहा हजाराच्यावर