मुंबई - मालाड पश्चिम काचपाडा येथील परमार इंडस्ट्रीयल इस्टेटच्या पहिल्या मजल्यावरील प्लास्टिकच्या गोडाऊनला मंगळवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. आग लागली त्यावेळी गोडाऊन बंद असल्याने या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मालाड (प.), काचपाडा येथील तळमजला अधिक तीन मजली परमार इंडस्ट्रीयल इस्टेटच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर २ हजार चौरस फुटाचे प्लास्टिकचे गोडाऊन आहे. हे गोडाऊन बंद असताना मंगळवारी (5 नोव्हेंबर) संध्याकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली. ही आग हळूहळू वाढून रात्री ८.३० वाजता आगीने रौद्र रूप धारण केले. अवघ्या तासाभरात या आगीचा आणखीन भडका उडाला आणि रात्री ९.५० वाजताच्या सुमारास आग जास्त वाढली.
![fire in plastic godown in malad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-04-malad-fire-news-7205149_05112019234206_0511f_1572977526_710.jpg)
![fire in plastic godown in malad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-04-malad-fire-news-7205149_05112019234206_0511f_1572977526_22.jpg)
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या आगीवर ८ फायर इंजिन, ६ जंबो वॉटर टँकर आणि १ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग कशामुळे लागली याबाबत अधिक तपास अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस करत आहेत.
![fire in plastic godown in malad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-04-malad-fire-news-7205149_05112019234206_0511f_1572977526_868.jpg)
![fire in plastic godown in malad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-04-malad-fire-news-7205149_05112019234206_0511f_1572977526_319.jpg)