ETV Bharat / state

पवईत धावत्या कारने घेतला पेट, जीवितहानी नाही - पवईत धावत्या कारला आग

पवईतील आयआयटी मेन गेटसमोर धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना आज(शुक्रवार) रात्री 9 च्या सुमारास घडली. आग लागल्यानंतर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

पवईत धावत्या कारला अचानक आग
पवईत धावत्या कारला अचानक आग
author img

By

Published : Mar 6, 2020, 11:10 PM IST

मुंबई - पवईतील आयआयटी मेन गेटसमोर धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना आज (शुक्रवार) रात्री 9 च्या सुमारास घडली. आग लागल्यानंतर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने चालक कारच्या बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पवईत धावत्या कारला अचानक आग

मुंबईतील पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथून गांधीनगर जंक्शन येथे मारुती स्वीफ्ट (एमएच ०४ सीजे ५५२५) ही कार आयआयटी मेनगेट समोरुन जात होती. यावेळी कारच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने रस्त्यात कार थांबवून पाहिले असता कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने चालक बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. घटनास्थळी जमलेल्या स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर, माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.

हेही वाचा - N- 95 मास्क डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विकू नये - राज्‍यमंत्री प्राजक्‍त तनपुरे

हेही वाचा - महिला दिन विशेष : बाईकमध्ये प्रॉब्लेम आहे का?..थांबा मी नीट करते.. महिला मोटर मॅकेनिकची कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.