मुंबई - जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रस्त्यावरील पवई आयआयटी मेन गेट समोर सकाळी साडेसहा वाजता एका मालवाहू ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकचे केबीन जळून पूर्णतः खाक झाले असून, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा - विमान 'टेक ऑफ' करताना धावपट्टीवर आली जीप; थोडक्यात टळला अपघात
पवई येथून गांधीनगर जंक्शनकडे निघालेला मालवाहू ट्रक आयआयटी मेन गेट समोर आल्यानंतर त्याच्या इंजिनमधून अचानक धूर येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. त्यानंतर इंजिनला आग लागली, यावेळी घटनेची माहिती अग्निशमन दलास देण्यात आली. तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी ट्रकच्या केबीनमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग ट्रकच्या पाठीमागील मालास पोहचली नाही. मात्र, आगीत ट्रकची केबिन जळून खाक झाली.
हेही वाचा - मनोरुग्णाने घेतला पोलिसाच्या बोटाचा चावा; नागपाड्यातील घटना