भांडुप येथील ड्रीम्स मॉलला काल रात्री १२ च्या सुमारास आग लागली. या आगीवर आज रात्री ८ वाजता म्हणजेच तब्बल २० तासांनी नियंत्रण मिळवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीच्या दुर्घटनेत एकूण ७८ रुग्णांना अग्निशमन दलाने बाहेर काढले असून त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीत ५ जण जखमी झाले आहेत अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
Bhandup Fire : सनराईज रुग्णालयाला लागलेली आग तब्बल २० तासांनंतर नियंत्रणात, मृतांचा आकडा ११ वर
21:53 March 26
ड्रीम्स मॉल सनराईज रुग्णालयात लागलेली आग तब्बल २० तासांनंतर आटोक्यात
21:38 March 26
१९ तासांहून अधिक काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, ११ जणांचे मृत्यू
भांडुप येथील ड्रीम्स मॉलला काल रात्री १२ च्या सुमारास आग लागली. ही आग गेल्या १९ तासांहून अधिक काळ विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीच्या दुर्घटनेत एकूण ७८ रुग्णांना अग्निशमन दलाने बाहेर काढले त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११ वर पोहचली आहे. आगीत ५ जण जखमी झाले आहेत अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
मृत रूग्णांची नावे -
१) निसार जावेद चंद्र (पुरुष वय - ७४ वर्ष)
२) गोविंदलाल दास (पुरुष वय - ८० वर्ष)
३) रवींद्र मुंगेकर (पुरुष वय -६६ वर्ष)
४) मंजुळा बथारिया (स्त्री वय -६५ वर्ष)
५) अंबाजी पाटील (पुरुष वय -६५ वर्ष)
६) सुधीर लाड (पुरुष वय -६६ वर्ष)
७) सुनंदाबाई पाटील (स्त्री वय - ५८ वर्ष)
८) हरीप सचदेव (पुरुष वय -६८ वर्ष)
९) श्याम भक्तीलाल (पुरुष वय - ७७ वर्ष)
१०) महादेव अय्यर (पुरुष वय - ७९ वर्ष)
११) अशोक वाघमारे (पुरुष वय - ६८ वर्ष)
19:50 March 26
सनराईज हॉस्पीटल आगीत ११ वा मृत्यू, १९ तासांनंतही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
भांडुप ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 11 वा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न 19 तासानंतरही सुरूच असून आग अजूनही धुमसत आहे. काल रात्री 12 वाजता आग लागली होती.
18:41 March 26
मॉलमध्ये रुग्णालय असणे गंभीर बाब, चौकशीचे आदेश दिले आहेत - महापौर पेडणेकर
मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम्स मॉलला गुरुवारी रात्री आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हॉस्पिटल होते. या रुग्णालयातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. मॉलमध्ये रुग्णालय हे मी पहिल्यांदाच बघितले आहे. मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
17:09 March 26
१० रुग्णांचा होरपळून मृत्यू, ५ जखमी, ७६ रुग्णांना काढले सुरक्षित बाहेर
भांडुप येथील ड्रीम्स मॉलला गुरूवार रात्री १२ च्या सुमारास आग लागली. ही आग गेल्या १५ तासांहून अधिक काळ विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत एकूण ७६ रुग्णांना अग्निशमन दलाने बाहेर काढले आहे. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
मृत झालेल्या रूग्णांची नावे -

१०) अज्ञात
जखमी रुग्णांची नावे -
१) चेतनदास गोडवाणी (पुरुष वय - ७८ वर्ष)
२) माधुरी गोडवाणी (स्त्री वय - ६८ वर्ष)
३) गिरीश मेमौन (पुरुष वय:-४३ वर्ष)
४) कुलदीप मेहता (पुरुष वय:-४८ वर्ष)
५) पुष्पक दरे (पुरुष वय:-६५ वर्ष)
इतर ३० रुग्णांना मुलुंड जम्बो कोविड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
14:58 March 26
भांडुप रुग्णालय आग : 78 पैकी 46 रुग्णांचा लागला शोध
78 पैकी 46 रुग्णांचा लागला शोध. जंबो कोविड सेंटर येथे 30, फोर्टीस रुग्णालय 4, ठाणे विराज रुग्णालय 2, बिकेसी जंबो 1, घाटकोपर गोदरेज रुग्णालय 1, सारथी हॉस्पिटल टॅंक रोड 1, अगरवाल हॉस्पिटल 5 तर घरामध्ये 2 रुग्ण आढळून आले आहेत. तर इतरांचा शोध सुरू आहे.
- या दुघेटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची नावे खालीलप्रमाणे -
1 निसार जावेदचंद 74 वर्ष पुरुष
2 मुणगेकर 66 वर्ष पुरुष
3 गोविंदलाला दास 80 वर्ष पुरुष
4 मंजुला बथारिया 65 महिला
5 अंबाजी पाटील 65 वर्ष पुरुष
6 सुनंदाबाई पाटील 58 वर्ष महिला
7 सुधीर लाड 66 वर्ष पुरुष
अनोळखी मृतदेह- ३
14:55 March 26
सनराईज रुग्णालय प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करणार - आयुक्त हेमंत नगराळे
भांडुप येथील ड्रीम्स मॉल मधील सनराईज हॉस्पिटलला गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला असून हे मृत्यू निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून फायर आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. आल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
13:13 March 26
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत - मुख्यमंत्री
भांडूप येथील सनराइज रुग्णालयाच्या आगीत मृत्यू झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही मदत जाहीर केली.
13:02 March 26
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली घटनास्थळाला भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भांडूप येथील आग लागलेल्या सनराइज रुग्णालयाची पाहणी केली. कोविड रूग्णालयाला तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. येत्या ३१ मार्चला ही परवानगी संपणार होती. सर्व रूग्णांना वाचवण्याचा प्रयत्न झाला मात्र, व्हेंटिलेरवर असलेल्या रूग्णांना स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
12:28 March 26
सनराइज रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आग
सनराइज रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आग लागली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी केली जाईल, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भांडुप येथील सनराइज रुग्णालयाला भेट देऊन घटनेचा आढावा घेणार आहेत.
11:34 March 26
१२ तासांनंतरही आग आटोक्यात नाही
काल(गुरुवारी) 11 वाजून 49 मिनिटांनी सनराईज रूग्णालयाला आग लागली आहे. आग लागून १२ तास उलटले तरी आग अद्याप पूर्णपणे विझलेली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या रुग्णालयात आग सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे.
10:14 March 26
सनराईज रूग्णालयात पुन्हा भडकली आग
सनराईज रूग्णालयातील आग पुन्हा भडकली आहे. त्यामुळे अग्निशामक विभागाची धावपळ उडाली आहे. युद्धपातळीवर ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.
09:14 March 26
एकूण मृतांचा आकडा नऊवर
सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण ९ जणांचे मृतदेह मिळाले आहेत. यातील दोघांचा मृत्यू आगीमध्ये झालेला नाही. या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू अगोदरच कोविडमुळे झालेला आहे, अशी माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे.
07:54 March 26
76 रूग्णांना बाहेर काढण्यात यश
सनराईज रूग्णालयामधून 76 रूग्णांना बाहेर काढण्यात यश आले आहे. 76 पैकी 73 रूग्ण कोरोनाबाधित होते तर, 3 इतर रूग्ण होते. 30 रुग्णांना मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भरती दाखल केले आहे. कोविडबाधित नसलेल्या ३ रूग्णांना फोर्टीस रूग्णालयात पाठवले आहे. तर शिल्लक रूग्ण स्वतःहून इतर रुग्णालयात दाखल झाले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
07:09 March 26
सनराइज रूग्णालयातील आगीची चौकशी करण्याचे आदेश
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी घटस्थळाला भेट दिली. त्यांनी या आगीच्या चौकशीचे दिले आदेश आहेत. रूग्णालयामध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का? अग्निसुरक्षा प्रमाणपत्र होते का? याची केली जाणार आहे.
07:02 March 26
आग विझवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू
सनराइज रूग्णालय मॉलमध्ये असल्याने आग विझवण्याच्या कामात अडचणी येत आहेत. आग लागून ७ तास झाले तरी आग अजूनही धुमसतच आहे. या आगीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
06:43 March 26
महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली घटनास्थळी भेट
अचानक आग लागल्याने रूग्ण व डॉक्टरांची पळापळ सुरू झाली. आगीची माहिती मिळताच 15 अग्निशामक दलाच्या 23 गाड्या व 12 पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिडीच्या सहाय्याने मदतकार्य सुरू आहे. ही आग लेवल-४ असल्याची माहिती अग्निशामक दलाकडून मिळाली आहे. या रूग्णालयातील रूग्णांना पुढील उपचारासाठी जवळच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन आगीची पाहणी केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.
06:14 March 26
सनराइज रूग्णालयाला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू
मुंबई - भांडूपमधील ड्रीम मॉलमध्ये असलेल्या सनराइज रूग्णालयाला गुरुवारी रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी आग लागली. याठिकाणी ७० रूग्ण उपचार घेत होते. यामध्ये, काही कोविड रूग्णांचाही समावेश आहे. या आगीत २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.