मुंबई - मुंबईच्या पूर्व उपनगरातील मानखुर्द मंडाळा येथील एका भंगाराच्या दुकानाला आग लागली होती. आगीवर अग्नीशमन विभागाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले आहे.
मंगळवार (दि. 23 जून) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मानखुर्द मंडाळा ट्रान्झिस्ट कॅम्प, लोरोईलाही मस्जीद जवळ, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे एका भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे 3 फायर वाहन, 5 जम्बो वॉटर टँकर, 3 वॉटर टँकर व 2 रेस्क्यू वाहने उपस्थित होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर 9 वाजून 48 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
आग सुमारे 15 हजार चौरस फुटाच्या गोडाऊनला लागली होती. या गोडाऊनमध्ये भंगाराचे सामान व ऑइलचे पिंप असल्याने आग भडकली होती. त्यातच जोराचा वारा वाहत असल्याने आग विझवण्यासाठी उशीर लागला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यावस्थापन विभागाने दिली.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवसांवर