ETV Bharat / state

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आलेल्या वेल्डिंगच्या कामामुळे लागली आग - राजेश टोपे - serum institute fire broke out due to welding work

सीरम इन्स्टिट्यूटला एसईझेड-थ्री या इमारतीला आग लागली असून या इमारतीत वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंग करतेवेळी निघालेल्या स्पार्कमुळे जवळच असलेल्या ज्वलनशील पदार्थाने पेट घेतल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली.

fire-broke-out-due-to-welding-work-at-serum-institute-said-rajesh-tope-in-mumbai
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आलेल्या वेल्डिंगच्या कामामुळे लागली आग - राजेश टोपे
author img

By

Published : Jan 21, 2021, 8:03 PM IST

मुंबई - पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्य झाला असून ही घटना दुर्दैवी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत कोव्हिडशिल्ड लसीचे नुकसान झाले नसल्याची माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सीरम इन्स्टिट्यूटला एसईझेड थ्री या इमारतीला आग लागली असून या इमारतीत वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंग करतेवेळी निघालेल्या स्पार्कमुळे जवळच असलेल्या ज्वलनशील पदार्थाने पेट घेतल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली.

राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

तीन तासांत अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण -

साधारण दुपारच्या 1वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलांला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलांला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, त्यानंतर केलेल्या तपासणीवेळी या आगीत पाच जण दगावले असल्याचे निदर्शनास आले. कोव्हिडशिल्ड लसीची इमारत घटनास्थळापासून दूर असल्याने लसीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'कोरोनावरील लस सुरक्षितच, संकोच बागळू नका'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.