ETV Bharat / state

Mumbai Fire : अब्दुल रहेमान स्ट्रीट येथील दुकानांना आग - Rahman Street in Mumbai

मुंबई - मस्जिद बंदर येथील सर्वाधिक गर्दीचा भाग म्हणून अब्दुल रहेमान स्ट्रीट ( Abdul Rahman Street ) ओळखली जाते. या रोडवरील सात ते आठ दुकानांना आग लागली ( Fire broke out at shops on Abdul Rahman Street ) आहे.

अब्दुल रहेमान स्ट्रीट येथील  दुकानांना आग

author img

By

Published : Jan 7, 2023, 9:15 PM IST

Updated : Jan 7, 2023, 10:40 PM IST

मुंबई - अब्दुल रहमान रस्त्यावरील जुम्मा मशिदीजवळील 7 ते 8 दुकानांना ( Fire broke out at shops on Abdul Rahman Street ) शनिवारी रात्री 8.15 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. तसेच पोलीस, पालिका कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अब्दुल रहमान रस्त्यावरील चार मजली इमारतीला आग लागून 7 ते 8 दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.

दुकानातील सामानाचे नुकसान - मस्जिद बंदर येथील सर्वाधिक गर्दीचा भाग म्हणून अब्दुल रहेमान स्ट्रीट ( Abdul Rahman Street ) ओळखली जाते. या रोडवरील सात ते आठ दुकानांना आग लागली ( Fire broke out at shops on Abdul Rahman Street ) आहे. हा विभाग होलसेल मार्केट म्हणून ओळखला जातो. यामुळे या विभागात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी सामान ठेवले जाते. आग लागल्याने दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे.

३ जंबो टँकरद्वारे आग विझविण्याचे काम सुरू - अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ४ फायर इंजिन आणि ३ जंबो टँकरद्वारे आग विझविण्याचे काम सुरू आहे. अब्दुल रहमान स्ट्रीट येथील जंजीकर स्ट्रीट जंक्शन, जुम्मा मशीद परिसरात ही ग्राउंड प्लस चार मजली इमारत आहे. या इमारतीतील एका दुकानाला रात्री आठच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आग परिसरातील 7 ते 8 दुकानांमध्ये पसरली. एक फायर इंजिन, चार मोटार पंप, चार फायर इंजिन आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन अधिकारी पुढील तपास करत आहेत. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दल तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभाकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Jan 7, 2023, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.