मुंबई : नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. हॉटेलच्या वरच्या मजल्यावरून धुराचे लोट निघत आहेत. सध्या इथे अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे असलेल्या पंचतारांकित हॉटेल रायडरच्या वरच्या मजल्यावरून धुराचे नोट लोट निघत असल्याचे काही पर्यटकांनी पाहिले. मुंबईतील पर्यटकांचे सर्वाधिक आवडीचे ठिकाण असलेल्या मरीन ड्राईव्ह येथे हे हॉटेल आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट : शनिवारी रात्री अनेक जण नाईट आउटसाठी इथे येत असतात, तर सकाळी जॉगिंगसाठी अनेक मुंबईकर मरीन ड्राईव्ह येथे येत असतात. अशाच काही लोकांना हॉटेल ट्रायडेंच्या वरच्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले, याची माहिती या लोकांनी तात्काळ हॉटेल प्रशासनाची यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच हॉटेल प्रशासनाने अग्निशामनदादाला पाचारण केले. मात्र, ही आग का लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भागात नागरिकांची नेहमीच वर्दळ : मुंबईतील नरिमन पॉईंट हा परिसर प्रतिष्ठित लोकांचा मानला जातो. कारण, याच भागात जिथून राज्याचा कारभार चालतो, असे मंत्रालय आहे. विधान भवन देखील याच भागात आहे. सोबतच अनेक प्रशासकीय इमारती देखील या भागात आहेत. त्यामुळे इथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अधिकारी, कर्मचारी व सामान्य लोक येत असतात. याला लागूनच मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण मरीन ड्राईव्ह आहे. त्यामुळे या भागात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. इथे अनेक पंचतारांकित हॉटेल आहेत. त्यापैकीच एक ट्रायडेंट आहे.
हेही वाचा :