मुंबई - पायधुनी परिसरातील अब्दुल्ला रहमान रस्त्यावरील सुपर शॉपिंग मार्केट या व्यावसायिक इमारतीला आज (सोमवार) सकाळी १०.५० मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या दुर्घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.