ETV Bharat / state

One Avighna building Fire : मुंबईतील वन अविघ्न इमारतीला आग, अनेकजण अडकल्याची भीती - fire brigade Efforts to extinguish fire

मुंबई : मुंबईतील वन अविघ्न इमारतीला ३५ व्या मजल्यावर आग लागली ( Fire breaks out at one Avighna ) आहे. आगीमुळे अनेकजण अडकल्याची माहिती आहे. अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या रवाना झाल्या आहेत.

One Avighna building Fire
वन अविघ्न इमारतीला आग
author img

By

Published : Dec 15, 2022, 11:10 AM IST

Updated : Dec 15, 2022, 11:45 AM IST

मुंबईतील वन अविघ्न इमारतीला आग

मुंबई : मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर आग लागली ( Fire breaks out at one Avighna ) आहे. आगीमुळे अनेकजण अडकल्याची माहिती आहे. अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या रवाना झाल्या आहेत. गेल्या वर्षीदेखील करीरोड येथील अविघ्न पार्क या इमारतीला आग लागली ( 8 fire brigade vehicles dispatched ) होती. या इमारतीला आज पुन्हा एकदा आग लागल्याचे समोर आली आहे. या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची तसेच या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली ( fire brigade Efforts to extinguish fire ) आहे.

अविघ्न पार्कला आग : मुंबईच्या करी रोड येथील महादेव पालव मार्ग, भारत माता सिनेमा समोरील उत्तुंग अशा अविघ्न पार्क या इमारती मधील एका घरामध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला सकाळी १०.४५ च्या दरम्यान देण्यात आली. त्यानुसार मुंबई अग्निशमन दल मुंबई पोलीस आणि महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लेव्हल वनची असल्याची घोषणा मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आली आहे.

याआधीही लागली होती आग : अविघ्न पार्क या इमारतीला मागील वर्षीही आग लागली होती. त्यावेळी या इमारतीची अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले होते. आग लागलेल्या ठिकाणावरून एका व्यक्तीने आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा याच इमारतीला आग लागल्याने या इमारतीच्या अग्नी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Last Updated : Dec 15, 2022, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.