मुंबई- गोरेगाव खडकपाडा येथील सामना परिवार गोडाऊनला मंगळवार (आज) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन आणि ५ जंबो वॉटर टँकर दाखल झाले आहेत. दरम्यान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. सुमारे १५ ते २० हजार चौरस फूट जागेवर आग पसरल्याची माहिती आहे. मात्र या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
हेही वाचा-मेळघाटात आदिवासींना होळीचे वेध; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लग्न समारंभात धरला आदिवासी नृत्यांवर ठेका