ETV Bharat / state

मुंबईतील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीवर १८.३० तासांनी नियंत्रण - आग आटोक्यात आली

मुंबई सेट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग विझवण्यात अग्निशामक दलास यश आले आहे. तब्बल साडे अठरा तास अथक परिश्रमानंतरही आग आटोक्यात आली. या घटनेत अग्निशामक दलाचे ५ जवान जखमी झाले आहेत.

Mumbai Mall Fire
सिटी सेंटर मॉल आगीवर १८.३० तासांनी नियंत्रण
author img

By

Published : Oct 24, 2020, 6:51 AM IST

मुंबई - शहरातील सेंट्रल भागातील येथील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री आग लागली होती. ही आग मॉलमध्ये सर्वत्र पसरल्याने आणि धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. अखेर तब्बल १८.३० तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवताना मुंबई अग्निशमन दलाचे ५ अपडेट बातमी - कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल येथे मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला गुरुवारी (२२ ऑक्टोबर) रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली. ही माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने रवाना केली. मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याने, पहाटे २ वाजून ४१ मिनिटांनी ही आग ब्रिगेड कॉल स्तराची असल्याचे अग्निशमन दलाने घोषित केले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्याची शर्थीचे प्रयत्न करत अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर शुक्रवारी दुपारी ३.३७ वाजता म्हणजेच तब्बल १८.३० तासांनी सर्व बाजूने नियंत्रण मिळवले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.

आग विझवण्यासाठी २५० अधिकारी, कर्मचारी -

सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. या ठिकाणी प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्यांना ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावर देखील पसरली असल्याचे लक्षात आले. आग विझवण्यासाठी २४ फायर इंजिन, १६ जंबो टँक यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने तैनात करण्यात आली होती. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.

५ जवान जखमी -
आगीमध्ये धुरामुळे श्वसनाचा तसेच इतर मार लागल्याने अग्निशमन दलाचे ५ जवान जखमी झाले. त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार करून त्या सर्वांना घरी सोडले आहे. रवींद्र चौगुले (५३ वर्ष), शामराव बंजारा (३३ वर्ष), भाऊसाहेब बदाने (२६ वर्ष), संदीप शिर्के व गिरकर (५० वर्ष) अशी या जवान आणि अधिकाऱ्यांची नावे आहेत.

इमारत केली खाली -
मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले होते. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले होते.

यांनी दिली भेट -
घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर, आमदार अमीन पटेल, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकानी यांनी रात्री उशिरा भेट देवून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.