मुंबई : घाटकोपर स्टेशन जवळ परख हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या विश्वास इमारतीमधील जुनोज पिझा हॉटेलच्या मीटर बॉक्सला आज दुपारी आग लागली. आगीमुळे सुरक्षिततेच्या कारणामुळे परख हॉस्पिटलमधील २२ रुग्णांना इतर रुग्णालयात सुखरूप हलवण्यात आले. मात्र या आगीत एका ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. इतर ११ जण जखमी झाले आहेत. त्यात ४ पोलिसांचा समावेश आहे.
२२ रुग्णांना सुरक्षित हलवले - घाटकोपर स्टेशनजवळ परख हॉस्पिटलच्या बाजूला विश्वास इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर जुनोज पिझा हॉटेल आहे. या हॉटेलच्या मीटर बॉक्समध्ये दुपारी २ च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या बाजूलाच लागून परख हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमधील रुग्णांना आगीचा आणि धुराचा धोका पोहचू नये यासाठी सुरक्षित रित्या २२ रुग्णांना परिसरातील इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीत एकाचा मृत्यू - या आगीत जखमी झालेल्या १२ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी कुरेशी देढीया या ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ११ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी २ जणांना पुन्हा परख हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. ९ जण राजावाडी रुग्णालयात दाखल असून त्यातील ४ जण पोलीस कर्मचारी आहेत.
परख रुग्णालय जखमिंची माहिती - तुकाराम घाग ४० वर्षे व शेख बहाद्दूर परिहार ४६ वर्षे या दोघांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करून परख रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. राजावाडी रुग्णालयातील जखमींची नावे - तानिया कांबळे १८ वर्षे ही १८ ते २० टक्के भाजली आहे. कुलसुम शेख २० वर्षे यांना धुरामुळे त्रास झाला. साना खान ३० वर्षे धुरामुळे त्रास. अनोळखी ३० वर्षीय एमआयसीयू गंभीर आहे. तर ४ पोलीस जखमी झाले. त्यामध्ये जय यादव ५१ वर्षे धुरामुळे त्रास, संजय तडवी ४० वर्षे धुरामुळे त्रास, नितीन विसावकर ३५ वर्षे धुरामुळे त्रास, प्रभू स्वामी ३८ वर्षे धुरामुळे त्रास यांचा समावेश आहे.
जखमींची माहिती -
परख रुग्णालय
तुकाराम घाग ४० वर्षे
शेख बहाद्दूर परिहार ४६ वर्षे
राजावाडी रुग्णालय -
तानिया कांबळे १८ वर्षे
कुलसुम शेख २० वर्षे
साना खान ३० वर्षे
अनोळखी ३० वर्षे (एमआयसियू गंभीर)
हितेश करानी ४९ वर्षे
के पी सूनार ४२ वर्षे
जय यादव ५१ वर्षे (पोलीस)
संजय तडवी ४० वर्षे (पोलीस)
नितीन विसावकर ३५ वर्षे (पोलीस)
प्रभू स्वामी ३८ वर्षे (पोलीस)