मुंबई : विश्व विख्यात क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्याविषयी धक्कादायक घटना उघड झाली आहे. सचिनच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो आणि आवाजाचा वापर करून वैद्यकीय उत्पादनांचा प्रचार करण्याचा प्रकार समोर आला. यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पश्चिम क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी शुक्रवारी दिली आहे.
-
Maharashtra | Former cricketer Sachin Tendulkar lodges a Police complaint at Mumbai Crime Branch, over his name, photo and voice being used in "fake advertisements" on the internet to dupe people. Case registered by Mumbai Police Cyber Cell against unidentified people under… pic.twitter.com/skkfDYa1eP
— ANI (@ANI) May 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | Former cricketer Sachin Tendulkar lodges a Police complaint at Mumbai Crime Branch, over his name, photo and voice being used in "fake advertisements" on the internet to dupe people. Case registered by Mumbai Police Cyber Cell against unidentified people under… pic.twitter.com/skkfDYa1eP
— ANI (@ANI) May 13, 2023Maharashtra | Former cricketer Sachin Tendulkar lodges a Police complaint at Mumbai Crime Branch, over his name, photo and voice being used in "fake advertisements" on the internet to dupe people. Case registered by Mumbai Police Cyber Cell against unidentified people under… pic.twitter.com/skkfDYa1eP
— ANI (@ANI) May 13, 2023
औषधी उत्पादनांच्या जाहिरातीत वापरले नाव : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या परवानगीशिवाय औषधी उत्पादनांच्या जाहिरातीसाठी त्याचे नाव, फोटो आणि आवाज वापरला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिनच्या सहायकाने गुरुवारी पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सचिन तेंडुलकरच्या सहायकाने गुरुवारी पश्चिम क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली होती, असे त्यांनी सांगितले. या तक्रारीमध्ये एका औषध कंपनीच्या ऑनलाईन जाहिराती दिसल्या. या जाहिरातीत सचिनने त्यांच्या उत्पादनाला मान्यता दिल्याचा दावा करण्यात आला होता.
-
"...We have noticed that there have been attempts to impersonate Sachin Tendulkar's attributes in an unauthorized manner, for selling products and services not associated with him. These are being done with a deliberate and malicious intention of misleading gullible citizens to… https://t.co/gELqhh9aty pic.twitter.com/mgGg83XvXo
— ANI (@ANI) May 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"...We have noticed that there have been attempts to impersonate Sachin Tendulkar's attributes in an unauthorized manner, for selling products and services not associated with him. These are being done with a deliberate and malicious intention of misleading gullible citizens to… https://t.co/gELqhh9aty pic.twitter.com/mgGg83XvXo
— ANI (@ANI) May 13, 2023"...We have noticed that there have been attempts to impersonate Sachin Tendulkar's attributes in an unauthorized manner, for selling products and services not associated with him. These are being done with a deliberate and malicious intention of misleading gullible citizens to… https://t.co/gELqhh9aty pic.twitter.com/mgGg83XvXo
— ANI (@ANI) May 13, 2023
सचिनचा फोटो वापरून केली जाहिरात : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फोटो वापरुन जाहिरात बनवल्याचे उघड झाले आहे. ही जाहिरात बनवणाऱ्या आरोपीने sachinhealth.in ही वेबसाइटही बनवल्याचे उघड झाले. यामध्ये सचिनचा फोटो वापरून या उत्पादनांची जाहिरात करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरने कंपनीला त्याचे नाव आणि फोटो वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे त्याची प्रतिमा मलीन होत असल्यामुळे त्याने त्याच्या सहायकाला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल : सचिन तेंडुलकर हा जगप्रसिद्ध खेळाडू असल्याने त्यांचे जगभरात चाहते आहेत. मात्र सचिनच्या नावाने बनावट वेबसाईट काढून औषधी उत्पादनाच्या जाहिरातीत त्याचा फोटो आणि नाव छापले आहे. त्यामुळे सचिनच्या प्रतिमेला तडा गेला आहे. सचिन तेंडुलकरने कंपनीला त्याचे नाव आणि छायाचित्रे वापरण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच, या जाहिरातीमुळे प्रतिमा खराब होत असल्याने सचिनने त्याच्या सहायकाला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी फसवणूकीच्या भादंवि कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -