ETV Bharat / state

बोगस बियाणांप्रकरणी दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश - बोगस बियाणांप्रकरणी कारवाई

बोगस सोयाबीन बियाणांवरून राज्यामध्ये खरिपाच्या तोंडावर चांगलेच वातावरण तापले आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोगस बियाणेप्रकरणी दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Fir registere against bogus soybean seeds company says cm uddhav thackeray
बोगस बियाणांप्रकरणी दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
author img

By

Published : Jun 28, 2020, 9:12 PM IST

मुंबई - बोगस सोयाबीन बियाणांवरून राज्यामध्ये खरिपाच्या तोंडावर चांगलेच वातावरण तापले आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोगस बियाणेप्रकरणी दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बोगस बियाणे देऊन त्याचे नुकसान जर कुणी करत असेल तर शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्याची नुकसान भरपाई वसूल केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

1 जुलै हा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. हा सप्ताह शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यांना आणि राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना मी विनम्रपणे नमस्कार करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हे दोघेही आपला सर्वांचा जीव वाचवणारी माणसे असल्याचेही ते म्हणाले.

आपल्या सर्वांसाठी मेहनत करून, घाम गाळून जो शेतकरी अन्नधान्य पिकवतो, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या बोगस बियाणांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. शेतकरी राबराब राबून जमीनीत बियाणे पेरतो, आपल्यासाठी अन्न धान्याचे उत्पादन करतो. परंतू त्याला बोगस बियाणे देऊन त्याचे नुकसान जर कुणी करत असेल तर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील. तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्याची नुकसान भरपाई वसुल केली जाणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

निवडणुकांमुळे आणि नंतर कोरोनामुळे काही भागातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नव्हता. पण आता त्यांनाही कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. कोरोनाशी लढताना कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. कोकणात पाहणी करण्यासाठी गेलो असताना हे वादळ किती भीषण होतं हे जाणवलं. पण आपल्या शासकीय यंत्रणेने खुप चांगलं काम करत निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलासा देण्याचे व कमीत कमी जिवीतहानी होईल याची काळजी घेतल्याचे दिसून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. समुद्रातील सर्व मच्छिमार बांधवांना किनाऱ्यावर आणण्यात यश आल्याची माहितीही त्यांनी दिली. कोकणातील फळबागा, घरे उध्वस्त झाली आहेत. त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.