ETV Bharat / state

Mumbai Crime : हेव्ही डिपॉझिटच्या नावाने महिलेची साडेनऊ लाखाची फसवणूक; तिघांना अटक - financial fraud with woman

हेव्ही डिपॉझिटच्या नावाने एका महिलेसह दोघांची साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना साकिनाका पोलिसांनी अटक केली. फरीदा अस्लम शेख, अस्लम साबीर शेख आणि आसिफ अस्लम शेख अशी या तिघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यात या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात फैजान पटेल हा आरोपी फरार असून त्याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Financial Fraud In Mumbaic
महिलेची साडेनऊ लाखाने फसवणूक
author img

By

Published : Apr 2, 2023, 8:17 PM IST

मुंबई: समीरा मोहम्मद वसीम खान आणि सुभाष रामचंद्र पातरा हे दोघेही साकिनाका परिसरात राहतात. त्यांना भाड्याने रुमची गरज असल्याने त्यांनी परिसरातील इस्टेट एजंटला सांगितले होते. या एजंटने त्यांची ओळख फरीदा, तिचा पती अस्लम, मुलगा आसिफ आणि फैजानशी करून दिली होती. त्यांनी त्यांचा कुर्ला येथे एक रुम आहे. पैशांची गरज असल्याने त्यांना तो रुम हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे, असे सांगितले होते. या दोघांनी तो रुम पाहिला होता. रुम पसंद पडल्यानंतर त्यांनी तो रुम भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या चौघांनी समीराकडून साडेचार ते सुभाषकडून चार लाख रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतले. मात्र रुमचा करार आणि रजिस्ट्रेशन होऊनही रुमचा ताबा दिला नाही.

पोलिसात तक्रार: चौकशीनंतर त्यांना तो रुम त्यांनी दुसर्‍या महिलेला विक्री करून तेथून पलायन केल्याचे समजले होते. या दोघांसह इतर काही लोकांना भाड्याने रुम द्यायचा आहे असे सांगून त्यांच्याकडूनही त्यांनी हेव्ही डिपॉझिट म्हणून पैसे घेतले होते. या सर्वांची फसवणूक केल्यानंतर ते चौघेही पळून गेले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी चारही आरोपींविरुद्ध साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती.

एका आरोपीचा शोध सुरू: या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच यातील एका गुन्ह्यांत फरीदाला तर दुसर्‍या गुन्ह्यांत तिचा पती अस्लम आणि मुलगा आसिफ या दोघांना पोलिसांनी अटक केली. तिनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. फैजान हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

दाम दुपटीचे आमिष: पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून असली नोटा घेऊन कागदी बंडल देणाऱ्या परराज्यातील टोळीला कोळसेवाडी पोलिसांनी 15 जानेवारी, 2023 रोजी शिताफीने बेड्या ठोकल्या. इशाख शरफ शेख (वय ४०) सोफीकुल लोन शेख (वय ४२), इम्रान मोहम्मद इक्बाल खान (वय ३० ) आणि महिला हमीदाबीबी जाफरअली गाजी (वय ४८) असे अटक केलेल्या टोळीचे नाव असून हे आरोपी मूळचे उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल मधील रहिवाशी आहेत.

अशी केली फसवणूक: तक्रारदार अझीम इस्माईल कर्वेकर (वय ५५) हे ठाण्यातील राबोडी परिसरात राहतात. त्यांची काही दिवसापूर्वी आरोपी महिला हमिदा हिच्याशी रिक्षा प्रवासात ओळख झाली होती. ओळखी दरम्यान त्या महिलेने आम्ही हातोहात दुप्पट पैसे करून देतो, अशी थाप मारून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्या महिलेने वारंवार त्यांना मोबाईलवर संपर्क केला. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार अझीम यांनी ४ जानेवारी २०२३ रोजी आरोपी महिलेने सांगितल्याप्रमाणे पैसे देण्यास तयार झाले.

हेही वाचा: Opposition Party Meeting: देशभरातील विरोधी पक्षांची अजून एक बैठक, डीएमकेने केले आयोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.