ETV Bharat / state

घाना देशातील टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

author img

By

Published : Jun 8, 2021, 11:28 AM IST

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 47 बँक खात्यांचे चेकबुक, पासबुक, 36 डेबिट कार्ड, 16 मोबाईल हँडसेट, 22 सिमकार्ड हस्तगत केले आहेत. याबरोबरच 14 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावांचे पॅन कार्ड, 1 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.

crime
crime

मुंबई- परदेशातून मटेरियल सप्लाय करण्याच्या नावाखाली टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली आहे. सदरचा गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले काही आरोपी छत्तीसगड बिहार राज्यातील असल्याचं समोर आले आहे. बिहार व छत्तीसगडमधून नवी मुंबईत येऊन भाड्याच्या खोलीत राहून सदरचा गुन्हा हे आरोपी करत होते.

घाना देशातील सरकारी यंत्रणेचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष
या प्रकरणातील पीडित तक्रारदार रविष पद्मनाभन फेबर हे इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिकल मोटरसाठी लागणारे गिअरबॉक्स यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. घाणा या देशातील शासकीय यंत्रणेला लागणारे इलेक्ट्रिक मोटर, गिअरबॉक्स टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवत सदरच्या टोळीने पीडित तक्रादाराला तब्बल 36 लाख 62 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने भरण्यास सांगितले होते. मात्र, एवढे पैसे भरूनही कुठल्या प्रकारचे टेंडर मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यासंदर्भात पीडित तक्रारदाराने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होतात.

एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास आलेल्या आरोपीला अटक
सायबर पोलिसांकडे सदरच्या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात तपास केल्यावर त्यांच्या लक्षात आले, की बिहार , छत्तीसगडमधील अटक करण्यात आलेले हे आरोपी नवी मुंबईत एका भाड्याच्या घरामध्ये राहून त्याच्या पत्त्यावर श्री एंटरप्राइजेस, गोल्डन एंटरप्राइजेस, विजय इंटरप्राईजेस, अर्चना इंटरप्राईजेस नावाने बनावट बँक खाती उघडून शेकडो लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. यासंदर्भात पीडित तक्रारदाराने पैसे भरल्यानंतर सदरचे पैसे काढण्यासाठी आरोपी नवी मुंबईतील एटीएम सेंटरमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांची ओळख पटवून त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे.

अटक आरोपींमध्ये भारतीय नायजेरियन ,आफ्रिकन लोकांचा सामावेश
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 47 बँक खात्यांचे चेकबुक, पासबुक, 36 डेबिट कार्ड, 16 मोबाईल हँडसेट, 22 सिमकार्ड हस्तगत केले आहेत. याबरोबरच 14 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावांचे पॅन कार्ड, 1 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली असून आरोपींकडून मिळून आलेल्या बँक खात्यांमध्ये तब्बल 3 कोटी 5 लाख रुपयांची रक्कम पोलिसांना आढळून आलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भारतीय, नायजेरियन, आफ्रिकन व्यक्तींचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.