ETV Bharat / state

अखेर नारायण राणेंचा भाजप प्रवेश ठरला; 1 सप्टेंबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह भाजपात - देवेंद्र फडणवीस

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. याला दुजोरा मिळाला आहे. नारायण राणे हे आपला पक्ष (स्वाभिमान पक्ष) देखील भाजपमध्ये विलीन करणार आहेत.

नारायण राणे
author img

By

Published : Aug 29, 2019, 9:29 PM IST

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे येत्या एक सप्टेंबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करुन भाजपत प्रवेश करणार आहेत. आपण भाजपत प्रवेश करत असल्याच्या वृत्ताला राणे यांनी दुजोरा दिला आहे. आज गुरुवारी बेस्ट कामगारांच्या उपोषणाला राणे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान राणे यांनी भाजपत जाण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नारायण राणे यांची दुजोरा देणारी बाईट

नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. याचवेळी नारायण राणे हे आपला पक्ष (स्वाभिमान पक्ष) देखील भाजपमध्ये विलीन करणार आहेत. याबाबतचे संकेत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. त्यानंतर मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी याबाबतचे संकेत दिले होते. यावेळी बोलताना, राणेंनी मला त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे निमंत्रण दिले होते. पण त्या कार्यक्रमाला जाणे मला शक्य झाले नाही. पण असे असले तरीही नारायण राणे हे आमच्यासोबतच आहेत. राणे हे राज्यसभेत भाजपच्याच चिन्हावर खासदार आहेत. त्यामुळे आता ते आपला पक्ष देखील भाजपमध्ये विलीन करणार असल्यास त्यांचे भाजपकडून स्वागतच केले जाईल. आम्ही सर्व घटक पक्षांना भाजपमध्ये घेऊ, त्यांनी काळजी करु नये, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर आज राणे यांनी आपण भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या १ सप्टेंबरला राणे आपला पक्ष विलीन करुन भाजपत प्रवेश करणार हे स्पष्ट झाले आहे.

Intro:मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे येत्या एक सप्टेंबरला आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करून भाजपात प्रवेश करणार आहेत. आपण भाजपात प्रवेश करत असल्याच्या वृत्ताला राणे यांनी दुजोरा दिला आहे. आज बेस्ट कामगारांच्या उपोषणाला राणे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान राणे यांनी आपण भाजपात जाण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Body:राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होत. याचवेळी नारायण राणे हे आपला पक्ष (स्वाभिमान पक्ष) देखील भाजपमध्ये विलीन करणार आहे. याबाबतचे संकेत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. काही दिवसापूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. त्यानंतर मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी याबाबतचे संकेत दिले होते. यावेळी बोलताना 'राणेंनी मला त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचं निमंत्रण दिलं होतं. पण त्या कार्यक्रमाला जाणं मला शक्य झालं नाही. पण असं असलं तरीही नारायण राणे हे आमच्यासोबतच आहेत. राणे हे राज्यसभेत भाजपच्याच चिन्हावर खासदार आहेत. त्यामुळे आता ते आपला पक्ष देखील भाजपमध्ये विलीन करणार असल्यास त्याचे भाजपकडून स्वागतच केले जाईल. आम्ही सर्व घटक पक्षांना भाजपमध्ये घेऊ. त्यांनी काळजी करु नये.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर आज राणे यांनी आपण भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या १ सप्टेंबरला राणे आपला पक्ष विलीन करून भाजपात प्रवेश कारण हे स्पष्ट झाले आहे.

नारायण राणे यांची दुजोरा देणारी बाईटConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.