ETV Bharat / state

मुंबईत पुन्हा छापेमारी, चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना याच्या 'क्वान टॅलेंट मॅनेजमेंट' कंपनीवर कर चुकवेगिरी प्रकरणांमध्ये आयकर विभागाकडून गुरुवारी पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे.

author img

By

Published : Mar 4, 2021, 12:03 PM IST

Updated : Mar 4, 2021, 1:24 PM IST

filmmaker-madhu-verma-montanas-office-raided-again-in-mumbai
चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना यांच्या कार्यालयावर पुन्हा छापेमारी

मुंबई - चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना याच्या मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या 'क्वान टॅलेंट मॅनेजमेंट' कंपनीवर कर चुकवेगिरी प्रकरणांमध्ये आयकर विभागाकडून गुरुवारी पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. मधू वर्मा मंटेना यांंनी हिंदी, तेलुगू व बंगाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. मधू वर्मा मंटेना यांनी 2008 मध्ये गजनी चित्रपटाची सुद्धा निर्मिती केली होती. मधू वर्मा हे बॉलिवूडमधील दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे चुलत भाऊ असून त्यांना नेशनाल फिल्म अवॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स हे पारितोषिके मिळालेली आहेत.

मंटेना यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

मंटेगा यांनी या चित्रपटाची केली निर्मिती -

चित्रपट निर्माता म्हणून मधू वर्मा मंटेना यांनी 2003 मध्ये तेलगू चित्रपट 'कार्तिक', 2008 मध्ये 'गजनी', 'रन' हे हिंदी चित्रपट, तर 'ऑटोग्राफ' या बंगाली चित्रपटाची निर्मिती केली होती. या बरोबरच 2010 मध्ये 'रक्तचरित्र' हा हिंदी चित्रपट, 'रक्तचरित्र 2' हा चित्रपट तेलुगु व तमिळमध्ये त्याने बनवला होता. याबरोबरच 2011 मध्ये 'मौसम' व 'झुटा ही सही' या चित्रपटाची निर्मिती सुद्धा मधू वर्मा यांनी केली होती.

फँटम चित्रपटाच्या माध्यमातून सहनिर्माता म्हणून सुरूवात -

मंटेगा यांनी 'फँटम' चित्रपटाच्या माध्यमातून सहनिर्माता म्हणून सुरूवात केली होती. त्यानंतर अनुराग कश्यप, विकास बहल व विक्रमादित्या मोट्वाने यांच्यासोबत सहनिर्माता म्हणून 'फँटम' फिल्म्सची निर्मिती केल्यानंतर त्यांच्याकडून, 'लुटेरा', 'हसी तो फसी', 'अगली', 'एनएच 10', 'हंटर', 'बॉम्बे वेल्वेट', 'शानदार', 'मसान', 'उडता पंजाब', 'रमण राघव 2', 'रॉंग साईड राजू', 'मुक्काबाज', 'हायजॅक', 'मन मर्जीया' व 'सुपर 30' या चित्रपटांची निर्मितीदेखी त्यांनी केली आहे.

हेही वाचा - बंदी असलेल्या बीएसआयव्ही वाहनांची विक्री करणारी टोळी गजाआड; 151 गाड्या जप्त

Last Updated : Mar 4, 2021, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.