ETV Bharat / state

मालेगावात चित्रपटप्रेमींची हुल्लडबाजी; कोरोना नियमांचे उल्लंघन

author img

By

Published : Mar 20, 2021, 7:17 PM IST

Updated : Mar 20, 2021, 8:05 PM IST

मालेगावमध्ये पुन्हा एकदा चित्रपटप्रेमींनी हुल्लडबाजी करत चित्रपटासाठी हाऊसफुल्‍ल गर्दी करत कोरोना नियमांना पायदळी तुडवले आहे. 'ना मास्क, ना सुरक्षित अंतर' अशा या हुल्लडबाजांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Malegaon theater
चित्रपटप्रेमींची हुल्लडबाजी

नाशिक - मालेगावमध्ये पुन्हा एकदा चित्रपटप्रेमींनी हुल्लडबाजी करत चित्रपटासाठी हाऊसफुल्‍ल गर्दी करत कोरोना नियमांना पायदळी तुडवले आहे. 'ना मास्क, ना सुरक्षित अंतर' अशा या हुल्लडबाजांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर आता प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मालेगावात चित्रपटप्रेमींनी केले कोरोना नियमांचे उल्लंघन

नाशिक शहराबरोबरच मालेगावसुद्धा कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. मात्र, याचे गांभीर्य मालेगावच्या नागरिकांना दिसत नसून, त्याचा प्रत्यय शुक्रवारी मोहन चित्रपट गृहाबाहेर पाहायला मिळाला. या ठिकाणी गुन्हे विश्वावरील ‘मुंबई सागा’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बघण्यासाठी आणि चित्रपटगृहात प्रवेश करण्यासाठी चित्रपटप्रेमींनी तोबा गर्दी केली होती. अपवाद वगळता कुणीही मास्क परिधान केले नाही. शिवाय तिकीट काढण्यापासून आत प्रवेश करण्यासाठी रेटारेटी झाली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून, महापालिका व पोलीस काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सहकार्यवाह

आधी फोडले होते फटाके -

मालेगावात चित्रपटप्रेमींची संख्या अधिक आहे. शुक्रवारी चित्रपट पाहायचाच, असा अनेकांचा ठरलेला विषय. त्यात शहरातील चित्रपटगृहांची संख्या कमी झाल्याने विशिष्ट चित्रपटगृहात चित्रपटप्रेमींची मोठी गर्दी होत असते. काही दिवसांपूर्वी मोहन चित्रपटगृहात करण अर्जुन चित्रपटाच्या प्रदर्शनात सलमान, शाहरुखच्या एंट्रीला चित्रपटप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी केली होती.

मालेगावात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन -

नाशिक शहरापाठोपाठ मालेगाव शहरात 878, तर तालुक्यात 210 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 184 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अंशत: निर्बंध लागू केलेत. त्यात सिनेमागृह, मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्केच व्यक्तींना प्रवेश देण्याचे निर्देश आहेत. शिवाय मास्क विना प्रवेश नाकारणे, प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंगही बंधनकारक केली आहे. मात्र, असे असताना मालेगावाच्या चित्रपटप्रेमींनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. आता जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - राष्ट्र्वादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' पुरस्कार प्रदान

Last Updated : Mar 20, 2021, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.