मुंबई : जोगेश्वरी येथील व्यारवली गावात सर्व्हे क्र. क्र. १-बी, १-सी येथे रवींद्र वायकर व हवाला किंग चंद्रकांत पटेल यांनी कमाल अमरोही स्टुडीओची २,५०,००० स्के.फू. जागा काही वर्षांपूर्वी विकत घेतली. चंद्रकांत पटेल हे २२६ कोटींच्या नोटबंदी दरम्यानच्या पुष्पक बुलियनच्या घोटाळ्यात सहभागी होते. त्यासंबंधात प्रवर्तन निदेशालय (ED) ची चौकशी सुरु आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात उज्वला मोडक, अतुल शहा, संतोष मेढेकर, नगरसेविका प्रिती सातम व अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांना पत्र : उपरोक्त जमिनीपैकी २००४ ते २००७ दरम्यान वायकर यांनी ८०,००० स्के.फू. च्या खेळाच्या मैदानाच्या जागेवर मुंबई महापालिकेशी करार करून ३३ टक्के जागेवर स्पोर्टस ट्रेनिंग सेंटर बांधले. त्याच्या समोरील उरलेली ६७ टक्के जागा ही कायमस्वरूपी लहान मुलांच्या खेळाचे मैदान म्हणून राहणार असा करारही महापालिकेसोबत केला असे, पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
रवींद्र वायकर यांचा घोटाळा : २०२१ मध्ये वायकर यांनी ही हकीकत लपवून या खेळाच्या मैदानावर २,००,००० स्के.फू. चे पंचतारांकित हॉटेलची परवानगी मिळवली. भाजपा किरीट सोमैया हे गेले दोन वर्षे या विषयाचा पाठपुरावा करत होते. याच सर्वे क्रमांकावर कमाल अमरोही स्टुडीओचा महाकाली गुफा व महाकाली गुफाला जाणाऱ्या रस्त्या संबंधित अश्याच पद्धतीने मुंबई महापालिकेने अपारदर्शकरित्या अमरोही स्टुडीओचे मालक, महल पिक्चर्स प्रा. लि.चे अविनाश भोसले, शहीद बालवा यांना घोटाळा करून डेव्हलपमेंट राईट, FSI / TDR २०२१ मध्ये दिला होता. सोमैया यांनी हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकारने हे डेव्हलपमेंट राईट, FSI आणि TDR रद्द केला. याच परिसरात रवींद्र वायकर यांचा घोटाळा झाला आहे. या संदर्भात किरीट सोमैया यांनी मार्च महिन्यात आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे तक्रारही दिली होती. त्या तक्रारीच्या आधारावर मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाची चौकशीही सुरु आहे.
हेही वाचा -