ETV Bharat / state

Nawab Malik-Sameer Wankhede : नबाब मलिकांवर गुन्हा दाखल करून 7 दिवसात अहवाल द्या; राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे मुंबई पोलिसांना आदेश - nawab malik and sameer wankhede dispute

हेमंत नगराळे यांच्याऐवजी (Mumbai CP Hemant Nagrale ) मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ ( Additional CP Mumbai Pravin Padwal ) हे आज आयोगासमोर दिल्लीतील कार्यालयात उपस्थित झाले. याप्रकरणी दिल्ली राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सुनावणीवेळी आयोगाने नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे दिलेत आदेश दिले आहेत.

Nawab Malik-Sameer Wankhede
नवाब मलिक-समीर वानखेडे
author img

By

Published : Jan 31, 2022, 4:01 PM IST

Updated : Jan 31, 2022, 4:59 PM IST

मुंबई - एनसीबी माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे जात प्रमाणपत्रावरुन सुरू झालेल्या वादानंतर मुंबई पोलिसांनी या संदर्भात काय कारवाई केली याकरिता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale ) यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ( Nawab Malik and Sameer Wankhede Dispute ) हेमंत नगराळे यांच्याऐवजी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ ( Additional CP Mumbai Pravin Padwal ) हे आज आयोगासमोर दिल्लीतील कार्यालयात उपस्थित झाले. याप्रकरणी दिल्ली राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर ( National Commission for Scheduled Castes ) सुनावणीवेळी आयोगाने नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे दिलेत आदेश दिले आहेत.

आदेशात आणखी काय?

समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्यात सुरू असलेल्या राज्य अनुसूचित जाती पडताळणी समितीकडे सुरू असलेल्या चौकशीची संपूर्ण माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती समितीसमोर देण्यात यावी तसेच त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये तसेच आयोगाकडे चौकशी प्रलंबित असेपर्यंत याप्रकरणी कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये, असे निर्देशही आज देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 7 मार्च रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. मंत्री नवाब मलिक यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला. मात्र, NCSCकडे समीर वानखेडेंनी तक्रार केली की, त्यांना या प्रकरणात खोटे गोवले जात आहे. मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या खुलाशानंतर वानखेडे यांनी या प्रकरणावर आयोगाला पत्र लिहून त्रास दिल्याचा आरोप केला. वानखेडे हे मुस्लिम होते आणि त्यांनी अनुसूचित जातीचा असल्याचा दावा करून आयआरएसमध्ये नोकरी मिळवली होती, असा आरोप मंत्र्यांनी केला होता.

हेही वाचा - Varsha Gaikwad on Students Agitation : सरकार चर्चेला तयार, विद्यार्थ्यांनी मोर्चे काढू नयेत - वर्षा गायकवाड

वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव नसून दाऊद असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र, वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. समीर वानखेडे यांना DRI विभागात पाठवण्यात आले आहे. डीआरआय विभागातूनच त्यांना मुंबई एनसीबीमध्ये आणून झोनल डायरेक्टर करण्यात आले. आता त्यांना पुन्हा डीआरआयकडे पाठवण्यात आले आहे.

Last Updated : Jan 31, 2022, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.