ETV Bharat / state

'घरात सडून मरण्यापेक्षा महात्मा गांधींच्या मार्गाने रस्त्यावर लढून मरा'

'इंटरनॅशनल ह्युमन राईट ऑर्गनायझेशन'च्या वतीने आज (2 जानेवारी) पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी एनआरसी आणि सीएए संदर्भात केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केंद्रातील सरकारने गेल्या पाच वर्षात लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले.

patil
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील
author img

By

Published : Jan 2, 2020, 11:04 PM IST

मुंबई - नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू करण्यासाठी केंद्र सरकारला अजून 25 वर्ष लागतील. मात्र, त्या निमित्ताने भारतीय समाजामध्ये दूषित वातावरण तयार करण्याचा कुटील डाव भाजप सरकारने आखला आहे, असा गंभीर आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. 'इंटरनॅशनल ह्युमन राईट ऑर्गनायझेशन'च्या वतीने आज (2 जानेवारी) पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी कोळसे पाटील यांनी एनआरसी आणि सीएए संदर्भात केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील

यावेळी, कोळसे पाटील म्हणाले, "घरात सडून मरण्यापेक्षा भारतीय जनतेने केंद्रातील कायद्याच्या विरोधात संविधानाच्या चौकटीत आणि महात्मा गांधींच्या मार्गाने रस्त्यावर उतरून लढा द्यावा. अहिंसेच्या मार्गातून त्यांनी जाचक सरकारला आपला विरोध दर्शवावा आणि मोदी-शाह यांना केंद्रात सरकार चालवणे अवघड करावे" केंद्र सरकारने आणलेला कायदा केवळ मुस्लिम समाजासाठीच नाही तर, देशातील दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि ओबीसी समाजालाही अत्यंत जाचक ठरणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - मोदी, शहा हे आरएसएसचे दलाल- बी.जी कोळसे पाटील

केरळ सरकारप्रमाणे राज्यातील ठाकरे सरकारनेही केंद्र सरकारला या कायद्यासंदर्भात विरोध दर्शवावा, असेही कोळसे पाटील यावेळी म्हणाले. तसे केल्यास, राज्यातील दलित, मुस्लीम, आदिवासी, भटके-विमुक्त अशी सर्व जनता त्यांच्या सोबत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. केंद्रातील सरकारने गेल्या पाच वर्षात लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले असल्याचेही ते म्हणाले.

Intro:घरात सोडून मरण्यापेक्षा महात्मा गांधी यांच्या मार्गाने रस्त्यावर लढून मरा ; माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांचे आवाहन

mh-mum-01-bgkolsepatil-nrc-byte-7201153

मुंबई, ता. २ :
केंद्र सरकारने आणलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक हे त्यांना पुढील पंचवीस वर्षात ही लागू करता येत नाही परंतु या निमित्ताने भारतीय समाजामध्ये एक दुहीचे वातावरण करण्याचा कुटील डाव केंद्रातील भाजप सरकार करत असल्याचा गंभीर आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज केला.

इंटरनॅशनल ह्युमन राईट ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आले होती. या वेळी माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी केंद्रातील कायद्याच्या विरोधासाठी जनतेने भारतीय संविधानाच्या चौकटीत आणि महात्मा गांधी यांच्या विचाराने रस्त्यावर उतरून लढा द्यावा व अहिंसेच्या मार्गातून आपला विरोध दर्शवावा, आणि मोदी शहा यांना केंद्रात सरकार चालवणे अवघड करावे असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशभरातून आता विरोध प्रकट होत असून केरळसारख्या राज्यात हा कायदा आपल्या राज्यात लागू करण्यासाठी केंद्र सरकारला आपला इंगा दाखवला राज्यातील ठाकरे सरकारनेही दाखवावा आम्ही सर्व राज्यातील दलित मुस्लीम आदिवासी भटके विमुक्त सर्व जनता हे त्यांच्या सोबत आहोत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रातील मोदी सरकारने मागील पाच वर्षात लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी त्यासाठीच्या असलेल्या सर्व संस्था खिळखिळ्या केल्या आहेत.उत्तर प्रदेशासारख्या राज्यांमध्ये भाजपाने अल्पसंख्यांक बुडायला टार्गेट करून त्यांच्यावर अतोनात अत्याचार सुरू केले आहेत. अशा वेळातच केंद्र सरकारने आणलेला हा कायदा केवळ मुस्लिम समाजाला नाही तर या देशातील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी समाजाला हे अत्यंत जाचक ठरणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधासाठी महात्मा गांधी यांच्या विचाराने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे अन्यथा हा कायदा लागू झाल्यास घरात सडून मरावे लागेल, असा इशारा आहे कोळसे पाटील यांनी यावेळी दिला.
Body:घरात सोडून मरण्यापेक्षा महात्मा गांधी यांच्या मार्गाने रस्त्यावर लढून मरा ; माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांचे आवाहन

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.