मुंबई - अलिकडच्या काळात शेती क्षेत्रावर मोठे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हळूहळू शेती करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत आहे. भारत देशात जवळपास ६० कोटी लोकसंख्या प्रत्यक्ष-अप्रत्यरीत्या शेतीवर अवलंबून आहे. देशातील ५० टक्के शेतकऱ्यांना असे वाटते की, आपल्या पुढच्या पिढीने शेती करु नये. एकीकडे सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गोष्टी करत आहे. मात्र, दुसरीकडे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. गाव कनेक्शनच्या सर्वेतून ही माहिती समोर आली आहे.
'गाव कनेक्शन' या माध्यम समुहाने केलेल्या सर्वेत हे वास्तव समोर आले आहे. या संस्थने देशातील १९ राज्यांमध्ये १८ हजारांपेक्षा जास्त लोकांशी चर्चा करुन सर्वे तयार केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची शेती करण्याबाबत उदासिनता असल्याचे समोर आले आहे.
काय आहेत कारणे -
शेतीमालाला योग्य दर मिळत नाही
उत्पन्नाची अनिश्चतता
शेतीसाठी वाढत जाणारा खर्च
नैसर्गिक संकटे
जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा
सरकारची धोरणे
४३.६ टक्के शेतकऱ्यांनी सांगितले की, आमच्या शेतीमालाला योग्य दर मिळत नाही, ही सर्वांत मोठी समस्या आहे. १९.८ टक्के सेतकऱ्यांनी सांगितले की, नैसर्गिक संकट ही मोठी समस्या आहे. १७ टक्के शेतकऱ्यांनी सांगितले की, शेतीसाठी वाढणारा खर्च
२०११ च्या जनगणनेनुसार १४.५ कोटी शेतकरी आहेत तर २७ कोटी लोकसंख्या ही शेती क्षेत्रातील कामगारांची आहे. तर ६० कोटी लोकसंख्या ही शेती किंवा त्यावर आधारीत आहे. शेती करणाऱ्या ५० टक्के लोकांना वाटते की, आपल्या पुढच्या पिढीने शेती करु नये.
सर्वेतून पुढे आलेली माहीती
४८ टक्के शेतकरी - पुढच्या पिढीने शेती करायला नको
३८ टक्के शेतकरी - काहीजण म्हणाले, शेती करायला हवी तर काहीजण म्हणाले शेती करायला नको
१३.९ टक्के - शेतकऱ्यांना वाटते मुलांनी शेती करावी मात्र, मुलांना शेती करावी वाटत नाही.
शेती सुधारण्यासाठी काय करायला हवे
शेती सुधारण्यासाठी काय करायला हवे, यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की,
१) ३८ टक्के शेतकरी - पाण्यासाठी कालव्याची व्यवस्था करणे
२) १८.८ टक्के - नदी जोडप्रकल्प करणे गरजेचे
३) १३.८ टक्के - वीजपंपासाठी कमी दरात वीजपुरवठा
४) १३.५ टक्के - पाणी अडवण्यासाठी छोटे बंधारे बांधणे
५) ७.६ टक्के - ठिबक सिंचन
६) ७.२ टक्के हातपंपाचा वापर
स्वराज इंडिया पक्षाचे योगेंद्र यादव म्हणाले की,
१) तरुणांमध्ये बरोजगारीचे प्रमाण वाढत आहे
२) दोन दशकापासून शेतीचे उत्पन्न वाढत नाही
३) महागाई सातत्याने वाढत आहे.
४) उद्योजकांना सुट मिळते मात्र, शेतकऱ्यांना मिळत नाही.
२००१ च्या जनगणनेनुसार देशात १२ कोटी ७३ लाख १२ हजार ८३१ शेतकरी होते. २०११ मद्ये हे प्रमाण - ११ कोटी ८७ लाख ८ हजारवर आली. म्हणजे १० वर्षात ८६ लाख शेतकऱ्यांनी शेती सोडल्याचे समोर आले आहे.
प्रत्येक वर्षी १ कोटी लोक शहराकडे स्थलांतरीत
भारत हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आवलंबून आहे. मात्र, प्रत्येक वर्षी १ कोटी लोक हे शेती सोडून शहराकडे स्थलांतरीत होत असल्याचे वास्तव गाव कनेक्शनच्या सर्वेतून समोर आले आहे.
सौैजन्य - 'गाव कनेक्शन' माध्यम समूह