ETV Bharat / state

Influenza in Maharashtra :महाराष्ट्रात नवीन प्रकारच्या फ्लूची लागण; एच३एन२चे आढळले ५८ रुग्ण, दोघांचा मृत्यू - राज्य साथ नियंत्रण विभाग

महाराष्ट्रात नवीन फ्लू विषाणूचे 58 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला झाला आहे. ५८ पैकी ४८ रुग्णांवर रुग्णलयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्य साथ नियंत्रण विभागाने दिली आहे.

Influenza in Maharashtra
Influenza in Maharashtra
author img

By

Published : Mar 15, 2023, 6:28 PM IST

मुंबई : देशभरात नवीन इन्फल्युएंझा आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात इन्फल्युएंझा ए च्या एच १ एन १ चे ३०३ तर एच ३ एन २ चे ५८ रुग्ण आहेत. एच ३ एन २ च्या ५८ पैकी ४८ रुग्ण रुग्णलयात भरती आहेत. एच १ एन १ मुळे ३ तर एच ३ एन २ मुळे २ मृत्यू झाले आहेत. नागपूर, अहमदनगर येथे हे मृत्यू झाले आहेत. त्यांची संशयित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. राज्यात २०१७ ते २०२३ या सात वर्षाच्या कालावधीत एच १ एन १ चे १५ हजार ५५० रुग्ण आढळून आले असून १७०८ मृत्यू झाले आहेत. अशी माहिती राज्याच्या साथ रोग नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे.

काय आहे इन्फल्युएंझा आजार : इन्फल्युएंझा हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझा टाईप ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. एच१ एन१, एच २ एन २, एच ३ एन २ या आजाराचे प्रभाकर आहेत. सर्वसाधारणपणे ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया इत्यादी लक्षणे या आजारात आढळून येतात. इन्फल्युएंझा बाबत रुग्ण सर्वेक्षण हे मुख्यतः लक्षणाधारीत आहे. या बाबत सर्व आरोग्य केंदात रुग्णाची तपासणी करण्यात येते. व त्याप्रमाणे लक्षणानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येतात. अशी माहिती साथ रोग नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे.

सात वर्षात १७०८ मृत्यू : २०१७ मध्ये स्वाईन फ्लू म्हणजेच एच १ एन १ चे ६१४४ रुग्ण आढळून आले त्यापैकी ७७८ मृत्यू झाले. २०१८ मध्ये २५९४ रुग्ण आढळून आले त्यापैकी ४६२ मृत्यू झाले. २०१९ मध्ये २२८७ रुग्ण आढळून आले तर २४६ मृत्यू झाले. २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार असताना १२१ रुग्णांची नोंद होऊन ३ मृत्यू झाले. २०२१ मध्ये ३८७ रुग्णांची तर २ मृत्यूची नोंद झाली. २०२२ मध्ये ३७१४ रुग्णांची तर २१५ मृत्यूची नोंद झाली. २०२३ मध्ये ३०३ रुग्णांची तर २ मृत्यूची नोंद झाली. गेल्या सात वर्षात एच १ एन १ चे १५ हजार ५५० रुग्ण आढळून आले असून १७०८ मृत्यू झाले आहेत.

या करण्यात येत आहेत उपायोजना : फल्यू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. फल्यू सदृष्य रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार केला जातो. राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यायांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपचार सुविधा असणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांना स्वाईन फल्यू उपचाराची मान्यता देण्यात आली आहे. ऑसेलटॅमीवीर आणि इतर साधनसामग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह आणि उच्चरक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना फल्यू प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली आहे. अन्न व औषध विभागामार्फत सर्व खाजगी औषध दुकांनामध्ये ऑसेलटॅमीवीर उपलब्ध ठेवण्यासाठी आंतरविभागीय समन्वय करण्यात येत आहे. फल्यू प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

असे झाले लसीकरण : राज्यात २०१५ पासून अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्लुएंझा लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांसोबत मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहेत. राज्यात १ लाख लस पुरवठा करण्यात आल्या असून त्यापैकी ९९ हजार ७७८ लसीकरण करण्यात आले आहे. पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर याठिकाणी लसीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा - Shinde Vs Thackeray In SC : सत्तासंघर्षाची सर्वोच्च लढाई! दोन्ही गटाचा जोरदार युक्तीवाद; आजची सुनावणी संपली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.